‘लस्ट स्टोरीज २’ या सिनेमामधील एका कथेत मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष व तिलोत्तमा शोम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही कथा अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने दिग्दर्शित केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कोंकणाने दिग्दर्शित केलेल्या कथेची चांगलीच चर्चा होत आहे. अशातच अमृता सुभाषने कोंकणासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अमृता सुभाषची पोस्ट –

“कोंकणा सेन शर्मा!या क्षेत्रात येण्याच्या आधीपासून मी तिला पाहत आले आहे. मिस्टर एंड मिसेस अय्यर पहिला आणि तिच्या प्रेमात पडले. तेव्हापासून तिच्याबरोबर काम करायचं स्वप्नं अखेर आयुष्यानं पुरं केलं. आत्ता लस्ट स्टोरीज तिनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा भाग होताना जाणवलं, ती उत्तम अभिनेत्री आहे, दिग्दर्शिका आहे, त्याहूनही उत्तम माणूस आहे. मला नेहमीच प्रोजेक्ट्स पेक्षा माणसं महत्त्वाची वाटत आली आहेत. त्यामुळे एखादे प्रोजेक्ट खूप यशस्वी होऊनही जर त्या माणसांशी जुळलं नाही तर हिरमुसायला होतं. लस्ट स्टोरीज काल नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यापासून त्यातल्या आमच्या कथेला कालपासून इतकं प्रेम मिळतं आहे, याच्या आनंदाइतकाच कोंकणासारखं माणूस आयुष्यात आलं याचा आनंद मोठा आहे. मी मराठीत जास्त काम केलं असल्यानं हिंदीतली फार कमी माणसं मला माहीत आहेत. कुठल्याही हिंदीतल्या पार्ट्यांना गेलं की मला फारशी माणसं माहीतीची नसतात. कोंकणा अशावेळी माझा हात हातात घेऊन मला ओढत कुठेशी नेते आणि कुणाकुणाला माझ्याविषयी भरभरून काही सांगत रहाते. मधेच मी कुणाशी काय बोलावं हे न सुचून बाजूला उभं राहून माणसांना निरखत असते तेव्हा ही कुठुनशी अवतरते आणि विचारते,”ठीक आहेस ना? चल थोडा वेळ डान्स करुया?” डान्स सुरु झाला आहे कोको! खूप मजा येते आहे.. येत राहणार आहे.”

Shahid Kapoor starr Deva box office collection day 2
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाच्या कमाईत वाढ, दोन दिवसांत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला 
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
tula shikvin changalach dhada adhipati big misunderstanding about wife akshara
अधिपतीचा अक्षराबद्दल मोठा गैरसमज! ‘ते’ दृश्य पाहताच होणार राग अनावर, नव्या अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…

अमृताने या पोस्टबरोबर कोंकणासोबतचे सेल्फीही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघींची धमाल, मस्ती पाहायला मिळते. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट्स करून ‘लस्ट स्टोरीज २’ मधील त्यांची कथा फार आवडल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader