Amy Jackson Announces Pregnancy: ‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री अॅमी जॅक्सनने दोन महिन्यांपूर्वी ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकशी लग्न केलं. आता अभिनेत्रीने आनंदाची बातमी दिली आहे. ३२ वर्षीय अॅमी लवकरच आई होणार आहे. तिने एडवर्डबरोबरचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे, यात ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अॅमी व एडवर्ड यांनी २७ ऑगस्टला इटलीतील अमाल्फी बीचवर डेस्टिनेशन वेडिंग केले. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केले. या लग्नात अॅमीचा पाच वर्षांचा मुलगा अँड्रियासही देखील सहभागी झाला होता. अॅमी व एडवर्ड वेस्टविक यांनी जानेवारी २०२४ मध्ये एंगेजमेंट केली होती. त्यांनतर दोघांनी लंडनमध्ये एंगेजमेंट डिनर पार्टी आयोजित केली होती आणि जवळच्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर दोघेही आता इटलीत विवाहबंधनात अडकले. आता या जोडप्याने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अॅमी व एडवर्ड लवकरच आई-बाबा होणार आहेत. अॅमीने कोणतेही कॅप्शन न देता हे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते व तिचे मित्र-मैत्रिणी कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत.
हेही वाचा – Video: ६ वर्षांचं नातं संपलं, मलायकाचं नाव ऐकू येताच राज ठाकरेंच्या शेजारी उभा असलेला अर्जुन कपूर म्हणाला…
अॅमीचं पहिलं ब्रेकअप अन् एडवर्डची आयुष्यात एंट्री
अॅमी व एडवर्ड २०२२ मध्ये एकमेकांना डेट करू लागले आणि दोन वर्षांनी त्यांनी लग्न केलं. त्यापूर्वी अॅमी एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करत होती. अॅमी एडवर्ड वेस्टविकशी लग्न करण्यापूर्वी बिझनेसमन जॉर्ज पानायियोटोबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. लग्न होण्याआधीच अॅमीने मुलाला जन्म दिला. अँड्रियास जॅक मुलाचं नाव ठेवलं. मात्र मुलाच्या जन्मानंतर अॅमी व जॉर्जचा साखरपुडा मोडला. जॉर्ज व अॅमी यांच्यात सतत मतभेद व्हायचे, त्यामुळे दोघांचे लग्न होण्याआधीच ब्रेकअप झाले आणि ती एकटीच मुलाला सांभाळू लागली. त्यानंतर अॅमीच्या आयुष्यात एडवर्ड आला. आता एडवर्ड अॅमीबरोबर त्याच्या आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे.
हेही वाचा – “मी काहीही केलं तरी…”, अभिषेक बच्चनला डेट करण्याच्या चर्चांबाबत निम्रत कौरचे वक्तव्य
अॅमी जॅक्सनचे करिअर
अॅमी जॅक्सनने अनेक बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून बॉलीवूड पदार्पण करणाऱ्या अॅमीने ‘येवाडू’, ‘ऑपरेशन फॉर्च्युन’, ‘थेरी’, ‘थंगमगन’, ‘मद्रासापट्टणम’, ‘देवी’, ‘गेथू’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या.