Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमासाठी सध्या संपूर्ण जामनगरमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये हा कार्यक्रम १ ते ३ मार्च दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये हॉलीवूड ते बॉलीवूडपर्यंतचे सगळे कलाकार सादरीकरण करणार आहेत.
सिनेसृष्टीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला खास उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे व कुटुंबीय यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील जामनगरमध्ये पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान करून वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळालं. ‘वूम्पला’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
अनंत-राधिका यांच्या या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी आपल्या देशासह परदेशातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. जगप्रसिद्ध गायिका रिहाना, डेव्हिड ब्लेन, अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ यांसह मराठमोळे गायक अजय-अतुल या प्री-वेडिंग सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत.
हेही वाचा : “२९ फेब्रुवारी तुझा वाढदिवस”, मृणाल कुलकर्णींनी विराजसला दिला खास सल्ला; लेकाला म्हणाल्या, “जसे कष्ट…”
दरम्यान, गेल्यावर्षी १९ जानेवारीला अनंत-राधिकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. यानंतर वर्षभराने आज त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा रंगली आहे. या सोहळ्याला अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान, माधुरी दीक्षित, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ असे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. प्री-वेडिंगनंतर येत्या १२ जुलैला या दोघांचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे.