अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची गुरुवारी रात्री मुंबईत एंगेजमेंट झाली. या खास दिवशी त्यांचे पाळीव श्वान अंगठी घेऊन आले आणि त्यांनी रिंग एक्सचेंज केली. त्यानंतर अनंतची आई नीता अंबानी यांनी सर्वांना एकत्र गोळा केलं आणि त्यांनी डान्स केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: नीता अंबानींनी केलं धाकट्या सूनेचं स्वागत; नणंद इशाच्या बाळाला खेळवताना दिसली राधिका, पाहा साखरपुड्यातील खास क्षण

नीता आणि मुकेश अंबानी आणि जवळच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या ‘देवा देवा’ गाण्यावर डान्स केला. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण त्यांच्या हातात सिल्व्हर आणि गोल्डन हार्ट कट-आउटसह गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या खास सोहळ्यासाठी राधिकाने गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर अनंतने निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनीही या कार्यक्रमासाठी गोल्डन आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

नीता अंबानी यांनी राधिकाचं सर्व विधीनुसार घरात स्वागत केलं. त्यानंतर राधिकाने अंबानी कुटुंबातील सर्वांचे आशीर्वाद घेतले. यावेळी राधिका इशा अंबानीच्या मुलांना खेळवतानाही दिसली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant dog carries rings nita ambani family dance on brahmastra song video hrc