सोशल मीडियावर सध्या सर्वत्र अंबानींच्या घरी पार पडणाऱ्या लग्नकार्याची चर्चा चालू आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते राजकीय क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत सगळेजण सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार्‍या विधींना आवर्जुन उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच अँटालिया या राहत्या घरी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा हळदी समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर, शिखर पहारिया, मानुषी, सारा अली खान, अनन्या पांडे, खुशी कपूर, ओरी, सलमान खान, रणवीर सिंह असे बरेच सेलिब्रिटी अँटालियामध्ये पार पडलेल्या हळदी समारंभात उपस्थित होते. या सगळ्यात एका मराठमोळ्या गायकाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या कार्यक्रमात मराठमोळ्या राहुल वैद्यने देखील खास परफॉर्मन्स सादर केला आहे.

हेही वाचा : तगर व झेंडूच्या फुलांची ओढणी, पारंपरिक लूक अन्…; अंबानींच्या होणाऱ्या सुनेचं देखणं रुप, हळदी समारंभाचे फोटो व्हायरल

राहुल व त्याची पत्नी दिशा परमार दोघंही हळदी समारंभाला जोडीने उपस्थित होते. यावेळी गायकाने काही रोमँटिक गाण्यांसह बॉलीवूडची एव्हरग्रीन गाणी सादर केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिल कपूर यांच्या ‘राम लखन’ चित्रपटातील “वन टू का फोर, फोर टू का वन माय नेम इज लखन…” हे एव्हरग्रीन गाणं राहुल वैद्य या सोहळ्यात गात असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह सुद्धा त्याच्यासह हातात माइक घेऊन “वन टू का फोर…” गाणं गाताना दिसतो.

हेही वाचा : मुकेश अंबानींनी ‘या’ मराठी अभिनेत्याला दिली मुलाच्या लग्नाची पत्रिका, फोटो शेअर करत म्हणाला, “आता जावं लागेल लग्नाला…”

रणवीर सिंह व राहुल वैद्य या कार्यक्रमात बेभान होऊन परफॉर्मन्स सादर करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ ‘pie02sang’ या राहुल वैद्यच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट येत्या १२ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. यांचा विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूड कलाकारांपासून ते परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्न लागल्यावर शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

Story img Loader