Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या भव्य लग्नसोहळ्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या सोहळ्यातील अनेक कार्यक्रमांची सांगता झाली असून, संगीत समारंभ नुकताच थाटामाटात पार पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या सोहळ्याला आलिया भट्ट, रणबीर कपूर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, वरुण धवन, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच क्रीडा क्षेत्रातील मंडळींसह विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळींनीदेखील या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. अनंत-राधिकाच्या या भव्य संगीत सोहळ्याचं आयोजन ५ जुलै रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर येथे करण्यात आलं होतं.
जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरनं या संगीत सोहळ्यात त्याच्या परफॉर्मन्सनं ‘चार चांद’ लावले; तर बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी डान्स परफॉर्मन्स करून या सोहळ्याची शोभा वाढवली. सलमान खानपासून ते जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंगपर्यंत अनेकांनी आपल्या हटके अंदाजात स्टेजवर डान्सचा जलवा दाखवला. सेलिब्रिटीजच्या डान्सचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत.
तसेच सोशल मीडिया सेन्सेशन ओरी, अभिनेत्री सारा अली खान, वीर पहारिया, अनन्या पांडे यांनीदेखील या संगीत सोहळ्यात डान्स केला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील ‘ये लडका हाये अल्ला’ तर ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील ‘साजन जी घर आए’ या गाण्यावर चौघं थिरकले आहेत. या डान्सचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा १ मार्च ते ३ मार्चदरम्यान भव्य स्वरूपात पार पडला. गुजरात येथील जामनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रसिद्ध व नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे गेल्या महिन्याच्या सुरुवातीला या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटली येथे क्रूझवर पार पडला. १२ जुलै रोजी अनंत आणि राधिका आता लग्नगाठ बांधणार आहेत. या जोडीचा साखरपुडा राजस्थानमधील नाथद्वारा येथे पार पडला होता. त्यानंतर त्यांनी मुंबईतील त्यांच्या अँटिलियाच्या घरी एंगेजमेंट पार्टी ठेवली होती.