Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी राधिका मर्चंटचा लग्नसोहळा आज १२ जुलै रोजी पार पडणार आहे. अंबानी कुटुंब नवरदेवाबरोबर लग्नस्थळी पोहोचले आहेत. या भव्य लग्नसोहळ्याला जगभरातील प्रसिद्ध कलाकारांसह नामवंत मंडळींदेखील दाखल झाली आहेत. तसंच बॉलीवूड सेलिब्रिटीदेखील या लग्नसोहळ्यासाठी अगदी उत्साहात सामील झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अनन्या पांडेने अनंत-राधिकाच्या लग्नासाठी उपस्थिती दर्शविली आहे. अनन्याने अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यापासून ते हळद, मेहंदी अशा विविध कार्यक्रमांना आणि विधींनाअगदी आवर्जून हजेरी लावली होती. तसेच बॉलावूडमधले अनेक कलाकार लग्नाआधीच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित होते.

हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च; किंमत वाचून व्हाल थक्क

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अनन्याने पिवळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला आहे. अनन्याच्या या लूकमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या आउटफिटमध्ये एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी ठरली, ती म्हणजे अनन्याच्या क्रॉप टॉपच्या मागे ‘Anants Brigade’ असं लिहिलं होतं. हे कस्टमाईज आउटफिट अनन्याने खास या लग्नासाठी बनवून घेतल्याचं दिसतंय.

तर संजय कपूरची लेक शनाया कपूरनेदेखील या लग्नाला उपस्थिती दर्शविली. शनाया कपूरने निळ्या रंगाचा गोल्डन वर्क असलेला डिझायनर लेहेंगा घातला होता. अगदी अनन्यासारखंच शनायाच्या टॉपच्या मागे ‘Anants Brigade’ असं लिहिलेलं दिसलं.

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने सोनेरी रंगाचा डिझायनर कुर्ता घातला होता. “मेरे यार की शादी है” असं अर्जुनच्या कुर्त्यामागे लिहिलं होतं.

तसंच सारा अली खान, इब्राहीम अली खान, खुशी कपूर, राजकुमार राव त्याच्या पत्नीसह, रितेश देशमुख-जिनिलिया, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, वीर पहारिया, जॅकी श्रॉफ असे अनेक कलाकार अनंत-राधिकाच्या (Anant Ambani wedding) लग्नस्थळी उपस्थित राहताना दिसले.

बॉलीवूडसह जगभरातील अनेक कलाकारदोखील या सोहळ्याला उपस्थित राहले आहेत. प्रसिद्ध रेसलर आणि अभिनेता जॉन सिनाने या लग्नासाठी खास भारतीय पोशाख परिधान केला आहे. जॉन सिनाचा हा लग्नातील लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आकाशी रंगाचा जोधपुरी कुर्ता जॉन सिनाने घातलेला या व्हिडीओत आपल्याला पाहायला मिळतोय.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नासाठी भारतात परतला शाहरुख खान, बॉलीवूडच्या किंग खानचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा लग्नसोहळा आज १२ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani radhika merchant wedding bollywood celebrities look with anants brigade slogan in it dvr