Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. या भव्य लग्नसोहळ्याला बॉलीवूड कलाकार, क्रीडा क्षेत्रातील मंडळींसह जगभरातील बड्या मंडळींना आमंत्रित करण्यात आलं होतं.

शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, अमिताभ बच्चन, अनन्या पांडे, सारा अली खान, विकी कौशल, कतरिना कैफ असे अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. अंबानी कुटुंबाच्या या लग्नसोहळ्यात अनेक कलाकारांनी सुपरहिट गाण्यांवर डान्स करीत सोहळ्याचा आनंद लुटला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Brides entry in her wedding day
VIDEO: “आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी” लग्नात नवरीची जबरदस्त एन्ट्री; धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच

माधुरी दिक्षित व्हायरल व्हिडीओ (Madhuri Dixit Video)

बॉलीवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित हिनंदेखील या लग्नसोहळ्यात डान्स केला. माधुरीचा वरातीतील डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ‘खलनायक’ चित्रपटातील “चोली के पीछे क्या है” या गाण्यावर माधुरी थिरकताना दिसतेय. हटके डान्स स्टेप्स करीत माधुरीनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

माधुरीच्या बाजूला अनन्या पांडे, ओरी हे तिच्या तालावर ठेका धरताना दिसतायत. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्यानं कमेंट करीत लिहिलं, “९० च्या काळातील बॉलीवूडची राणी”, “माधुरी आजही खूप सुंदर नाचते.”

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात नीता अंबानींनी केला शाहरुख खानबरोबर भन्नाट डान्स; VIDEO VIRAL

माधुरी दीक्षितनं या सोहळ्यासाठी ‘रिंपल अ‍ॅंड हरप्रीत’ या ब्रॅण्डचा लेहेंगा परिधान केला होता. खुले केस, मिनिमल मेकअप यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून दिसलं होतं. माधुरी तिच्या पतीसह आणि मुलासह या सोहळ्याला हजर होती.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा (Anant Ambani and Radhika Merchant) शाही विवाहसोहळा काल शुक्रवारी (१२ जुलै) रात्री पार पडला. वधू आणि वराने ग्रॅण्ड एन्ट्री घेत एकमेकांना वरमाला घातली. सप्तपदी घेत दोघं सात जन्माचे साथी झाले. अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. अखेर राधिका मर्चंट अंबानी घराण्याची सून झाली.

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग (Anant Radhika Pre-wedding)

अनंत अंबानी-राधिका मर्चंटचा साखरपुडा २०२३ मध्ये झाला होता. त्यानंतर मार्च महिन्यात गुजरात जामनगर येथे दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगप्रसिद्ध गायिका रिहानानं परफॉर्मन्स केला होता. तर या कपलचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा युरोपमध्ये पार पडला. सोहळ्याची सुरुवात २९ मे रोजी झाली आणि १ जून रोजी त्याचा समारोप झाला. हा प्री-वेडिंग सोहळा इटली आणि फ्रान्समध्ये लक्झरी क्रूझ जहाजावर आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा… Anant Ambani Wedding: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च; किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यानंतर पुढील दोन दिवस आणखी दोन समारंभ असतील; ज्यात अनुक्रमे १३ जुलै व १४ जुलै रोजी ‘शुभ आशीर्वाद’ व ‘मंगल उत्सव’ म्हणजेच स्वागत समारंभ या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

Story img Loader