Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला आज सुरूवात झाली असून अनेक बॉलीवूड कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, अजय देवगन, सलमान खान अशा अनेक कलाकारांनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान यांनी एकत्र आधी हजेरी लावली होती. तर काही वेळाने शाहरुख खान पत्नी गौरीसह या लग्नसोहळ्यात उपस्थित राहिला. पापाराझींनी त्यांचं स्वागत केल्यानंतर शाहरुख खानचा आता नवरदेवाच्या आईबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हेही वाचा… ‘Anant’s Brigade!’ अनंत-राधिकाच्या लग्नाला बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी; पाहा कलाकारांचे खास लूक
शाहरुख खान आणि नीता अंबानींचा व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL)
शाहरुखने लग्नस्थळी पोहोचल्यानंतर आधी नवरदेवाच्या आईची म्हणजेच नीता अंबानी यांची गळाभेट घेतली. लग्नसोहळ्याला सुरूवात झाली असल्याने आजूबाजूला अनेक कलाकार आणि दिग्गज मंडळी नाच-गाण्याचा आनंद घेताना दिसत होती. शाहरुख खानची भेट नीता अंबानी यांच्याशी होताच दोघं मिठी मारून डान्स करू लागले. त्यानंतर शाहरुखने मुकेश अंबानी यांच्याबरोबरही काही डान्स स्टेप्स केल्या असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय.
शाहरुख आणि नीता अंबानी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर शाहरुखला सलमान खानची साथ मिळाली आणि बॉलीवूडचे दोन खान एकत्र नीता अंबानी यांच्याबरोबर थिरकताना दिसले.
हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च; किंमत वाचून व्हाल थक्क
अनंत-राधिकाच्या (Anant Ambani Radhika Merchant) या भव्य लग्नसोहळ्यासाठी शाहरुखने राखाडी रंगाची शेरवानी घातली होती. तर या लग्नासाठी गौरीने गोल्डन रंगाच्या डिझायनर ड्रेसची निवड केली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कलाकारांसह क्रिडा क्षेत्रातील मंडळीही या सोहळ्यात थिरकताना दिसतायत. भारतासह जगभरातील प्रसिद्ध कलाकार आणि नामवंत मंडळीदेखील या लग्नासोहळ्याचा आनंद लूटताना दिसतायत.
दरम्यान, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला सुरूवात झाली आहे. लवकरच सप्तपदी घेऊन दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.