Anant Ambani and Radhika Merchant wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी मामेरू विधी, संगीत सोहळा, शिव शक्ती पूजा, हळद, गृह शांती, मेहंदी अशा अनेक कार्यक्रमांची आणि विधींची सांगता झाली.

या भव्य लग्नसोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाने भारतासह परदेशातील बड्या मंडळींना आमंत्रित केलं आहे. किम कार्दशियन, युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, गायक रेमा आणि लुईस फोन्सी तसंच सॅमसंगचे सीईओ असे अनेक कलाकार आणि प्रसिद्ध मंडळी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
shah rukh khan charge how much fees to perform at delhi wedding
दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

हेही वाचा… अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने जस्टिन बीबरला मारली मिठी, व्हिडीओ व्हायरल

अलीकडेच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या लेकीबरोबर न्यूयॉकमध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसला होता. आता शाहरुखदेखील खास अनंत-राधिकाच्या लग्नासाठी भारतात परतला आहे.

सध्या शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत शाहरुख कलिना विमानतळावरून बाहेर पडताना दिसतोय आणि सुरक्षारक्षकांसह आलेला हा किंग खान कारमध्ये बसताना दिसतोय.

शाहरुख खान आणि सुहाना खानचं न्यूयॉर्क वेकेशन (Shah Rukh Khan)

अलीकडेच शाहरुख त्याची लेक सुहाना खानबरोबर न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बाप-लेक एका दुकानात शूज खरेदी करताना दिसत होते. एका कॉन्टेन्ट क्रिएटरने शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्या क्रिएटरने असाही खुलासा केला की शाहरुख त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी गप्पा मारत होता.

हेही वाचा… चांदीचं मंदिर अन् सोनेरी मूर्ती…, ‘अशी’ आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लग्नपत्रिका, पाहा VIDEO

शाहरुख खान आणि सुहाना खान त्यांच्या आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘किंग’मध्ये एकत्र काम करणार आहेत. ते न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनसाठीदेखील तयारी करत होते.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नसोहळा (Anant Ambani and Radhika Merchant wedding)

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंटचं लग्न आज १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शुभ मुहूर्तावर होणार आहे.  मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत-राधिकाच्या या लग्नसोहळ्यानंतर पुढील दोन दिवस आणखी दोन समारंभ असतील, ज्यात अनुक्रमे १३ जुलै आणि १४ जुलै रोजी ‘शुभ आशीर्वाद’ आणि ‘मंगल उत्सव’ यांचा समावेश असणार आहे.

Story img Loader