दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्य यामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चनला ओळखले जाते. तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेला ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा नुकताच पार पडला. अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी हा सोहळा संपन्न झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली. सध्या त्याचे अनेक व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत.
आणखी वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्यात दीपिका पदुकोणचा शाही थाट, साडीची किंमत माहीत आहे का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुडा सोहळ्याला ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनने उपस्थिती दर्शवली. त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्याने हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. त्यात ऐश्वर्या अतिशय सुंदर दिसत आहे. तर आराध्याने पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.

यावेळी पापाराझी फोटो काढत असताना आराध्या ही मागे वळते. त्यामुळे तिची केसांची स्टाईल विस्कटते. मात्र ऐश्वर्याने अतिशय काळजीपूर्वक आराध्याचे केस व्यवस्थित केले. यामुळे नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. ऐश्वर्या तिच्या अभिनेत्री असण्याबरोबरच आई असण्याचे कर्तव्यही करत आहे, अशी भावना नेटकरी व्यक्त करताना दिसत आहे.