अनंत अंबानी व राधिका मर्चंट (Anant Ambani Wedding) शुक्रवारी (१२ जुलैला) मुंबईत लग्नबंधनात अडकले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नासाठी विदेशातून अनेक पाहुणे आले होते, त्यापैकी कार्दशियन सिस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. किम व ख्लोए या दोघींची अनंत-राधिकाच्या लग्नात खूप चर्चा झाली.

किम कार्दशियन व ख्लोए या दोघीही गुरुवारी (११ जुलैला) लग्नासाठी मुंबईत आल्या. त्यांचं मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. त्या अनंत- राधिकाच्या लग्नात, शुभ आशीर्वाद सोहळ्यात व रिसेप्शनमध्ये उपस्थित होत्या. या तिन्ही सोहळ्यातील त्यांनी पारंपरिक व वेस्टर्न असा मिलाफ असलेले पोशाख घातले होते. साडी, डिपनेक ब्लाऊज व हिरेजडीत दागिने या दोघींनी घातले होते.

Video : अमृता पाठोपाठ पैठणी साडी नेसून ‘या’ मराठी अभिनेत्रीची अंबानींच्या रिसेप्शन पार्टीत एन्ट्री, कोण आहे ती?

ख्लोएने अनंत व राधिकाच्या लग्नात पांढऱ्या रंगाचा सोनेरी वर्क असलेला लेहेंगा घातला होता. तिने मांग टिका व दोन मोठ्या हिजेजडीत हारने तिचा लूक पूर्ण केला होता. ख्लोएचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना राखी सावंतची आठवण झाली आहे. राखीचा अशाच लूकमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर ख्लोएने तिच्या या लूकमधील एक सेल्फी व्हिडीओ शेअर केला होता. हे दोन्ही व्हिडीओ कोलाजकडून या दोघींमध्ये खूप साम्य असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

राजीव भाटिया कसा झाला अक्षय कुमार? नाव बदलल्यावर वडिलांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला, “तेव्हा राजीव गांधी…”

ख्लोए व राखी यांच्यातील साम्य पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ख्लोए व राखी सावंत यांच्यातील साम्य पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेकांनी राखी ख्लोएपेक्षा जास्त चांगली दिसते असं म्हटलं आहे. आता हा व्हिडीओ पाहून राखी म्हणू शकते की तीही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली होती, अशा कमेंट्स काही जण करत आहेत. राखी चुकीच्या देशात जन्मली नाही तर तीही ख्लोए कार्दशियनपेक्षा कमी नसती, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ख्लोए व राखीचा हा कोलाज व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. नेटकरी यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स
Khloe Kardashian rakhi sawant 2
व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स
Khloe Kardashian rakhi sawant 1
व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

५००० कोटींचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट, तरीही डोक्यावर कर्ज अन्…; अनिल अंबानींपेक्षा श्रीमंत आहेत पत्नी टीना मुनीम

किमने शेअर केले फोटो

ख्लोए व किम यांनी तीन दिवस अनंत व राधिकाच्या लग्नातील सर्व सोहळ्यांना हजेरी लावली. ‘इंडिया हॅज माय हार्ट’ म्हणत किमने या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात तिने इशा अंबानी तसेच नवविवाहित जोडप्याबरोबर काढलेले फोटोही पोस्ट केले आहेत.

ख्लोए कार्दशियन हिनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक स्टोरी व तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोघीही बहिणींच्या लूकची सध्या जोरदार चर्चा होत आहे.