बॉलीवूड स्टार्स अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे त्यांच्या डेटिंगमुळे अनेकदा चर्चेत असतात. जरी दोघांनी आपल्या नात्याबद्दल जाहीरपणे खुलासा केला नसला तरी खूप वेळा ते एकत्र माध्यमांसमोर आले आहेत. मुलाखतींदरम्यान अप्रत्यक्षपणे एकमेकांबद्दल बोलण्यावरून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेहा धुपियाचा टॉक शो ‘नो फिल्टर नेहा’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अनन्या पांडेला ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे का, असं विचारल असता, अनन्या म्हणाली, “मी असं म्हटलं नाही की, आम्ही फक्त मित्र आहोत. हे सगळं तुम्ही बोलताय, तुम्ही म्हणताय…”

अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. गेल्या वर्षी जेव्हा अनन्या ‘कॉफी विथ करण’च्या शो मध्ये गेली होती तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं. शोमध्ये जेव्हा रिलेशनशिपबद्दल करण अनन्याला म्हणाला होता की, आदित्य आणि ती एकत्र येऊ शकतात तेव्हा रिलेशनशिप्सबद्दल ती भरभरून बोलली होती.

हेही वाचा… इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधीबरोबर झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली, “मी या चित्रपटासाठी…”

या वर्षाच्या सुरुवातीला अनन्या आणि आदित्यने युरोपमध्ये एक ट्रिप केली होती. त्याआधी अनन्या आणि आदित्य माद्रिदमध्ये एकत्र आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमध्ये गेले होते. आनंद अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात ते अनेकदा एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले.

यापूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने सोशल मीडिया आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं होत. तेव्हा ती म्हणाली होती की तिला वैयक्तिक गोष्टी खासगी ठेवायलाच आवडतात.

हेही वाचा… शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

दरम्यान, अनन्याच्या कामाबद्दल सांगायच झालं. तर अनन्या ‘कंट्रोल’ आणि ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर’ या आगामी चित्रपटांत झळकणार आहे. वरुण धवन आणि वीर दास यांच्यासोबत ही अभिनेत्री ‘कॉल मी बे’ या टीव्ही सीरिजमध्ये दिसणार आहे. अनन्या सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करीत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday aditya roy kapur dating actress opened up about relationship dvr