आयपीएलचा प्रत्येक सामना सध्या रंगतदार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मोठमोठे बॉलीवूड सेलिब्रिटी या सामन्यांना आवर्जुन उपस्थिती लावतात. आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ही बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची टीम आहे हे आता सर्वश्रुत आहे. दरवर्षी शाहरुख त्याच्या अनेक कलाकार मित्रमंडळींना सामने पाहण्यासाठी आमंत्रित करतो. याशिवाय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी तो स्वत: स्टेडियममध्ये उपस्थित असतो.
यंदाच्या आयपीएलचा २८ वा सामना लखनौ विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात शाहरुखच्या केकेआर टीमने बाजी मारली. रविवारी पार पडलेल्या या सामन्याला शाहरुखची लेक सुहाना खान आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे उपस्थित होती.
हेही वाचा : Video : घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सलमान खान, गॅलेक्सी अपार्टमेंटजवळचा व्हिडीओ व्हायरल
सुहाना आणि अनन्या गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. त्यामुळे अनन्या पांडे आयपीएलच्या सुरुवातीपासूनच केकेआरच्या बहुतांश सामन्यांना हजेरी लावत आलीये. परंतु, यावेळी अभिनेत्रीने आयपीएल दरम्यानचा एक खास फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो जुना असून तेव्हा नुकतीच IPL ची सुरुवात झाल्याचं या फोटोतून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा : सुलेखा तळवलकरांच्या लेकीला पाहिलंत का? कॉलेजमध्ये मिळालं मोठं यश! आईचा आनंद गगनात मावेना
अनन्याने शेअर केलेल्या जुन्या फोटोमध्ये सुहाना आणि अनन्या दोघीही लहान दिसत आहेत. याशिवाय या दोघींच्या बाजूला अभिनेता शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अनन्याचे वडील चंकी पांडे पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. “आम्ही बदललो…पण, कोलकाता टीमला सपोर्ट कायम करणार…कोर्बो लोर्बो जीतबो” असं अनन्याला या पोस्टद्वारे सूचित करायचं आहे.
दरम्यान, अनन्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती शेवटची ‘खो गए हम कहाँ’ या चित्रपटात झळकली होती. आता लवकरच अनन्या सी शंकरन नायरच्या नव्या चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे.