बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओंमुळे टीकेचा विषय ठरणारी अनन्या आता मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अनन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात अनन्याचे फोटो काढण्याच्या नादात एक फोटोग्राफर खाली पडलेला दिसत आहे. त्याला पाहिल्यावर अनन्याने जे केलं त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अनन्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
सेलिब्रेटींचे फोटो काढणं फोटोग्राफर्ससाठी मोठा टास्कच असतो. अनेकदा असं करताना त्यांना दुखपतही होती. आताही असंच काहीसं घडलं. अनन्या पांडेचे फोटो काढताना एका फोटोग्राफरचा तोल गेला आणि तो खाली पडला. हे पहिल्यानंतर अनन्याने जे केलं त्यामुळे ती सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्यांच्या इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा- “गावातली मुलगी ते सेक्स कॉमेडी…” राधिका आपटेने मांडलं स्वतःच्या बोल्ड भूमिकांबद्दलचं मत
अनन्या पांडे एका कार्यक्रमानंतर आपल्या कारमध्ये बसण्यासाठी जाक असताना बऱ्याच फोटोग्राफर्सनी तिचे फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. अनन्याचे फोटो काढत असताना गर्दीमध्ये एका फोटोग्राफरचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. हे पाहिल्यानंतर अनन्या पांडे तिथेच थांबली आणि तिने त्याची विचारपूस केली. ती त्या फोटोग्राफरला पडलेलं पाहून म्हणाली, “अरे जरा सांभाळून, तुम्ही ठीक तर आहात ना, मला हात द्या तुमचा.” असं म्हणून अनन्याने त्याला उठण्यास मदतही केली.
आणखी वाचा- “तिचे उत्तम संगोपन…”; लाडकी लेक अनन्याबद्दल चंकी पांडेने दिली होती प्रतिक्रिया
अनन्या पांडेचा हा केअरिंग अंदाज पाहून चाहते सोशल मीडियावर तिचं कौतुक करताना दिसत आहे. फोटोग्राफर खाली पडल्यानंतर अनन्या तिथेच थांबली. तो उठून ठीक होत नाही तोपर्यंत ती तिथेच थांबली. त्यानंतर ती आपल्या कारमध्ये जाऊन बसली. दरम्यान अलिकडेच ती बॉलिवूडच्या हॅलोविन पार्टीमध्ये दिसली होती. त्यावेळचा तिचा लूक बराच चर्चेत होता. अनन्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘ड्रीम गर्ल 2, ‘कहां खो गए हम’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे तीनही चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.