अनन्या पांडे सध्या सध्या विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित CTRL या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने ती ब्रेकअप झाल्यावर काय करते असं सांगितलं. यावेळी तिने खुलासा केला की तिने तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडचे फोटोही जाळले होते. आता ब्रेकअपसारख्या गोष्टी जास्त समजुतदारपणे हाताळत असल्याचंही तिने नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गॅलाटा इंडियाशी बोलताना अनन्याने ब्रेकअप झाल्यावर ती त्यातून कशी सावरते, ते सांगितलं. अनन्या म्हणाली, “परिस्थितीला सामोरे जा. ब्रेकअप स्वीकारा, कारण या जगात काहीच पर्मनंट नाही. तुम्ही यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढाल.” चित्रपट निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी प्रेमभंग झाल्यावर त्याचा सामना करणं महत्त्वाचं आहे, असं सांगितलं. “तुम्हाला याचा सामना करावा लागेल, एकतर एखाद्याशी बोलून किंवा त्यांची फोटो जाळून”, असं ते म्हणाले.

अभिनेत्री अनन्या पांडे (फोटो – इन्स्टाग्राम)

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट OTT वर होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी

एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळण्याबद्दल अनन्या म्हणाली…

अनन्याने प्रेमभंग (हार्टब्रेक) झाल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे फोटो कधी जाळले का? असं विचारल्यावर ती म्हणाली, “मी आता तसं करत नाही, पण मी तसं केलं आहे. खरं तर असं करणारी मी पृथ्वीवरील एकमेव नाही, बरेच लोक असं करतात. कारण हा राग काढण्याचा एक चांगला मार्ग आहे.” अनन्याने यावेळी ‘जब वी मेट’ मधील करीना कपूरच्या गीत या पात्राचा उल्लेख केला. अनन्याच्या मते, खऱ्या आयुष्यात ती गीतसारखी आहे.

“घरातून प्रेतयात्रा चालल्यासारखं…”, अरबाज जाताना निक्कीच्या वागण्यावर पंढरीनाथ कांबळेचे परखड वक्तव्य

काही महिन्यांपूर्वी अनन्या-आदित्य रॉय कपूरचं ब्रेकअप

अनन्या पांडे व अभिनेता आदित्य रॉय कपूर दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. दोघांचे व्हेकेशनचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. इव्हेंट्सना ते एकत्र हजेरी लावायचे. त्यांनी जाहिराती एकत्र केल्या होत्या. तसेच अनन्याच्या घरी कोणताही कार्यक्रम असला की आदित्य हमखास हजेरी लावायचा. २०२२ पासून ते दोघे एकत्र होते, पण या वर्षी मे महिन्यात त्यांचं ब्रेकअप झालं अशा बातम्या आल्या.