अभिनेत्री अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘लायगर’, ‘काली पिली’, ‘पती पत्नी और वो’, ‘ड्रीम गर्ल २’, या चित्रपटातून काम करत आपला चाहतावर्ग निर्माण केला. अनन्याच्या चित्रपटांसह तिच्या ती कोणाला डेट करत याच्या सुद्धा चर्चा असतात. अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
त्यानंतर अनन्या पांडे वॉकर ब्लँकोबरोबरच्या अफवांमुळे चर्चेत आली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या समारंभात दोघे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ‘फोर्ब्स इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने पुढील पाच वर्षांत तिची लग्न करण्याची योजना असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा…वरुण धवनच्या ‘या’ सिनेमात बॉडी डबल म्हणून केलं काम, आता मुख्य भूमिकेत पदार्पण करणार ‘हा’ अभिनेता
अनन्या पांडेने लग्नाच्या योजना व्यक्त केल्या
अनन्याने पुढील पाच वर्षांसाठी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्लॅन्सबद्दल सांगताना म्हटले, “पाच वर्षांनी मी लग्न केलेले असेल, मी सुखी घरामध्ये दिसेल अशी आशा आहे. तेव्हा आम्ही बाळांसाठी योजना आखत असू.” असे तिने नमूद केले.
अनन्याचे व्यावसायिक उद्दिष्ट
अनन्याने तिच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांबाबतही विचार मांडले. “मी पुढील काही वर्षात स्वतःला माझ्या कामात यशाच्या शिखरावर पाहू इच्छिते. स्पर्धा नेहमीच असते, परंतु सध्या मी माझ्या कौशल्यावर काम करत आहे आणि त्यात सुधारणा करत आहे.”
अनन्या पांडे आणि वॉकर ब्लँको यांच्या नात्याच्या चर्चा
‘बॉम्बे टाइम्स’नुसार, अनन्याने अनंत अंबानीच्या लग्नात वॉकरची तिचा ‘पार्टनर’ अशी ओळख करून दिली होती. एका सूत्राने सांगितले की, “ती हे लपवत नव्हती. अनेकांनी त्यांना रोमँटिक गाण्यावर नाचताना पाहिले.” मात्र, या जोडप्याने अद्याप या चर्चांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
वॉकर ब्लँको सध्या जामनगर येथील अंबानींच्या वनतारा येथे काम करतो, अशी माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार वॉकर ब्लँको हा अमेरिकेचा रहिवासी आहे. अनन्याच्या २६ व्या वाढदिवसानिमित्त वॉकरने इन्स्टाग्रामवर “हॅपी बर्थडे ब्यूटीफुल! तू खूप खास आहेस! आय लव्ह यू, अॅनी !” अशी एक खास पोस्ट केली होती.
अनन्या लवकरच लक्ष्य लालवानीबरोबर ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटात झळकणार आहे. तिच्या नेटफ्लिक्सवरील ‘CTRL’ चित्रपटाच्या यशामुळे ती आनंदी आहे. ‘CTRL’ पूर्वी अनन्याने ‘कॉल मी बे’ या वेब सीरिज दमदार अभिनय केला होता. ANI ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याच्या आई भवना पांडे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “अनन्याने केलेल्या मेहनतीला प्रेक्षकांनी स्वीकारले, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.”