Ananya Panday Rumored Boyfriend Walker Blanco : २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटातून अनन्या पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. ती अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. आज अनन्या आपला २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अनन्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. मात्र, या सगळ्यात वॉकर ब्लँकोने अनन्यासाठी लिहिलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही महिन्यांआधी अनन्या पांडे ( Ananya Panday ) आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. ते दोघंही अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसले होते. याशिवाय परदेशात फिरायला देखील गेले होते. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यांच्या जवळच्या मित्राने दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता आदित्यबरोबर ब्रेकअप झाल्यावर अनन्याच्या आयुष्यात वॉकर ब्लँकोची एन्ट्री झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Bigg Boss संपल्यावर सूरज चव्हाण रमला गावच्या शेतात, ट्रॅक्टरही चालवला; नेटकरी म्हणाले, “गावरान मुंडे…”

अनंत अंबानींच्या लग्नात वॉकर ब्लँको आणि अनन्या पांडे ( Ananya Panday ) पहिल्यांदा एकत्र भेटले होते. अनन्याला तिचा कथित बॉयफ्रेंड वॉकर ब्लँकोने खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वॉकर ब्लँको लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ब्युटीफूल… तू खूप खास आहेस… आय लव्ह यू अ‍ॅनी” या पोस्टसह अनन्याचा गोड हसतानाचा फोटो देखील वॉकर ब्लँकोने शेअर केला आहे.

हेही वाचा : Priya Bapat : प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”

वॉकर ब्लँको ( Ananya Panday Rumored Boyfriend Walker Blanco )

हेही वाचा : Vishakha Subhedar : विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”

( Ananya Panday Rumored Boyfriend Walker Blanco )

अनन्याचा कथित बॉयफ्रेंड वॉकर ब्लँको कोण आहे?

अनन्या पांडेचा ( Ananya Panday ) कथित बॉयफ्रेंड वॉकर ब्लँको हा अमेरिकेचा रहिवासी आहे. तो शिकागो, इलिनॉय येथील स्थानिक आहे. फ्लोरिडा येथील वेस्टमिन्स्टर ख्रिश्चन स्कूलमधून त्याने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर २३ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून तो प्राणीप्रेमी असल्याचं लक्षात येतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday rumoured boyfriend walker blanco shares birthday wish post for her sva 00