करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला असून या ट्रेलरमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेलरमधील व्हायरल फोटोत बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टारकिडची झलक पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभिनेत्री सारा अली खान पोहोचली गोव्यात, ‘त्या’ व्यक्तीसह फोटो शेअर केल्यामुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या ३ मिनिटे २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिसणारी ही स्टारकिड दुसरी-तिसरी कोणीही नसून अभिनेत्री अनन्या पांडे आहे. ट्रेलरमध्ये अनन्या पांडे आणि रणवीर सिंह एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यात अनन्याने लाल रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : 72 Hoorain चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल; मुस्लीम समाजाची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ट्रेलर अगदी बारकाईने पाहिल्यावर प्रेक्षकांना अनन्याची झलक पाहायला मिळेल. ट्रेलरमध्ये अनन्याला पाहून तिचे चाहते प्रचंड खूश झाले असून सध्या तिचे ट्रेलरमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. करण जोहरच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये त्याच्या जवळचे कलाकार कॅमिओ करताना दिसतात. यापूर्वी ‘ए दिल है मुश्किल’ मध्ये आलिया भट्टने डीजेची भूमिका साकारली होती. तसेच ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधील ‘द डिस्को सॉंग’मध्ये काजोलने खास कॅमिओ केला होता. अगदी त्याचप्रमाणे अनन्या पांडेही एका गाण्यासाठी कॅमिओ करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

ट्रेलरमध्ये अनन्या पांडेची झलक

दरम्यान, आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने करण जोहरने तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली असून, २८ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya panday spotted in alia bhatt and ranveer singh rocky aur rani ki prem kahani trailor sva 00