बॉलिवूडच्या अनेक कलाकारांबरोबरच त्यांची मुलंही कायमच चर्चेत असतात. हे कलाकार अद्याप मनोरंजन क्षेत्रात आलेले नाही. तरीही त्यांच्या फॉलोअर्समध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. सध्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अनन्या पांडे, सारा अली खान आणि जान्हवी कपूर याचं नाव घेतलं जातं. काही दिवसांपासून या तिघींमध्ये चढाओढ सुरु असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र नुकतंच याबद्दल अभिनेत्री अनन्या पांडेने भाष्य केले आहे.

अनन्या पांडे, सारा अली खान आणि जान्हवी कपूर या तिघीही स्टार किड्स आहेत. सध्या या तिघीही सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या तिघींमध्ये शत्रुत्व असल्याचे बोललं जात होतं. त्या तिघींमध्ये कायमच चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळते. मात्र नुकतंच ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अनन्या पांडेने याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
आणखी वाचा : Video : “आर्यन चांगला अभिनेता बनू शकत नाही”, शाहरुख खानचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “तो दिसायला…”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

“आमच्यात शत्रुत्व वैगरे काहीच नाही. या सर्व गोष्टी निराधार आहेत. जर मला, सारा आणि जान्हवी आम्हा तिघींना एखाद्या महिला केंद्रीत चित्रपटात कास्ट केले तर हा प्रेक्षकांसाठी फारच वेगळा अनुभव असेल. तसेच या चित्रपटाच्या सेटवरही छान वातावरण असेल. कारण आमच्या तिघींमध्येही आत्मविश्वास आहे. आम्ही तिघीही नव्या ऊर्जेने काम करतो.” असेही ती म्हणाली.

“मला त्या दोघीही कलाकार म्हणून आवडतात. आम्ही एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. प्रेक्षकांनाही आम्हाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला आवडेल, असं मी ठामपणे सांगू शकते”, असेही अनन्याने म्हटले.

आणखी वाचा : तब्बल २४ वर्षांनी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल काजोलचा खुलासा, म्हणाली “तर मी सलमानची…”

अनन्या पांडे ही लायगर या चित्रपटात झळकली होती. आता ती लवकरच ‘खो गये हम कहाँ’ आणि ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात झळकणार आहे. तर जान्हवी कपूर ‘NTR 30’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस धोनी’ या चित्रपटात व्यस्त आहे. त्याचबरोबर सारा अली खान विकी कौशलबरोबर एका चित्रपटात झळकताना दिसणार आहे.

Story img Loader