बॉलिवूडचे स्टार किड्स सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओंमुळे टीकेचा विषय ठरणारी अनन्या आता मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अनन्याने एक इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे, ज्यामुळे तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अनन्या पांडेने आर्यन खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे तिने आर्यन खानबरोबरचा लहानपणीचा फोटो शेअर करत तुला शुभेच्छा दिल्या आहेत. अनन्या पांडे, आर्यन खान एक दोघांना लहानपणापासून ओळखत आहे. या दोघांचे वडील एकमेकांचे चांगले मित्र आहेत. १२ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता.
Photos: डेटिंगच्या अफवा, लग्न अन् ६ वर्षांनी झाले पालक; बिपाशा-करणची लव्हस्टोरी आहे खूपच इंटरेस्टिंग
आर्यन खानने मध्यंतरी माधुरी दीक्षितच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी त्याच्यासह त्याची बहीण सुहाना खानही या इव्हेंटला उपस्थित होती. यात अभिनेत्री अनन्या पांडेचा समावेश होता. विशेष म्हणजे अनन्या ही सुहाना खानची बालपणीची मैत्रीण आहे. मात्र आर्यन खानने तिला भेटणं टाळलं आणि तो निघून गेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांच्यात काहीतरी बिनसलं आहे अशी चर्चादेखील झाली होती.”लहान आर्यनला मी खूप मिस करत आहे. माझ्या पहिल्या आणि कायमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनन्या अलिकडेच बॉलिवूडच्या हॅलोविन पार्टीमध्ये दिसली होती. त्यावेळचा तिचा लूक बराच चर्चेत होता. अनन्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘ड्रीम गर्ल २, ‘कहां खो गए हम’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे तीनही चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहेत.