बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे बोल्ड लूक चांगलेच व्हायरल होतात. याबरोबरच आपल्या चित्रपटांच्या बाबतीत अपडेट देण्यातही अनन्या तत्पर असते. नुकतीच अनन्या ‘लायगर’ या चित्रपटात झळकली. साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं. यामध्ये अनन्या आणि विजय दोघेही मुख्य भूमिकेत होते.

चित्रपटातील कलाकारांनी ‘बॉयकॉट’ मुद्द्यावर भाष्य केल्याने या चित्रपटाला त्याचा चांगलाच फटका बसला. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेतसुद्धा हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. प्रेक्षकांनी याची प्रचंड खिल्ली उडवली. यातील अनन्याच्या पात्राबद्दल तर खूप काही बोललं लिहिलं गेलं. अनन्याला अभिनयावरुन ट्रोल केलं जातं पण ‘लायगर’ने त्या ट्रोलिंगमध्ये आणखीन भर घातली.

Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

आणखी वाचा : प्रणय, प्रेम अन् नातेसंबंधांचा ट्रिपल तडका; ‘फोर मोर शॉटस प्लीज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या अपयशानंतर अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. आता अनन्याने सोशल मिडियायवर पोस्ट करत आणखी एका चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे. सोशल मीडियावर अनन्याने भावूक होऊन पोस्ट करत चित्रपटातील सगळ्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘खो गये हम कहाँ’चं दिग्दर्शन अर्जुन वराइन सिंग करणार असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. फरहान अख्तर आणि रितेश सीदवानी यांच्या ‘एक्सेल प्रोडक्शन’ बॅनरखाली हा चित्रपट तयार होणार आहे. अनन्याबरोबरच सिद्धांत चतुरवेदि आणि आदर्श गौरव हे कलाकारही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोविड काळात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अजूनही कुणीच खुलासा केलेला नाही. असं म्हंटलं जात आहे की हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

Story img Loader