बॉलिवूडमधील अभिनेते जरी एकमेकांचे स्पर्धक असतील तरी पडद्यामागे त्यांची घट्ट मैत्री आहे. सुनील शेट्टी जॅकी श्रॉफ, अजय देवगण संजय दत्त हे अभिनेते यांची मैत्री अनेकवर्षांपासून आहे. आता याच अभिनेत्यांची मुले एकमेकांचे मित्र मैत्रिणी बनले आहेत. शाहरूख खानची मुलगी सुहाना आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या मैत्रिणी आहेत. नुकत्याच दोघी एकत्र गाडीतून जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या देशात सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. बॉलिवूडमध्येदेखील प्रत्येक सण उत्साहात साजरा करतात. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने दिवाळी निमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्स उपस्थित होते. स्टार्स किड्सदेखील आता पार्ट्याना जाऊ लागले आहेत. पार्टीनंतर सुहाना अनन्या गाडीत एकत्र दिसल्या. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कॉमेंट करण्यास सुरवात केली आहे.

“या माणसाला मी…”; राजामौलींबाबत ए. आर. रहमान यांनी दिली प्रतिक्रिया

एकाने लिहले आहे दोघांचे वडील कष्ट करत आहेत यांचा पत्ता नाही. एकाने लिहले आहे आर्यन खानवर दोघी बोलत असतील. काहींनी त्यांच्या सौंदर्यबद्दल कॉमेंट केली आहे. दोघी खूप सुंदर दिसत आहे असं काहींचं म्हणणं आहे. एकाने लिहले आहे दोघींनी खूप संघर्ष केला आहे. काहीजणांनी त्यांच्या पेहरावावर टीका केली आहे.

अनन्या नुकतीच लायगर चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. सध्या तीच नाव आदित्य रॉय कपूरबरोबर जोडलं जात आहे. एका पार्टीमधील या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहता दोघं खरंच एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण या दोघांच्या वयामध्ये १३ वर्षाचं अंतर आहे. सुहाना खानला अनेकदा स्टायलिश लूकमध्ये पाहण्यात आले आहे, मात्र या पार्टीसाठी तिने प्रथमच साडी नेसली होती. गोल्ड शिमर साडीमध्ये सुहाना छान दिसत आहे. पारंपरिक पोशाखात सुहानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya pandey suhana khan spotted at manish malohtra diwali party spg