बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे शेवटची विजय देवरकोंडाबरोबर ‘लायगर’मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. पण ती अनेकदा इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये हजेरी लावत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच ती रविवारी रात्री एका इव्हेंटमध्ये दिसली. यानंतर ती तिच्या लूकमुळे नाही तर तिच्या पर्समुळे चर्चेत आली आहे. तिने बादलीच्या आकाराची एक छोटी पर्स कॅरी केली होती. ही पर्स पाहून नेटकरी अनन्याला ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मंचावर येत मिठी मारली अन्…, ब्रेकअपनंतर २२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र दिसले अक्षय कुमार-रवीना टंडन

अनन्या पांडे रविवारी रात्री एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अनेक बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. पुलकित सम्राट, सोनम बाजवा, सुश्मिता सेन, माधुरी दीक्षित, क्रिती खरबंदा, जान्हवी कपूर, क्रिती सेनॉन, आयुष्मान खुराना आणि शिल्पा शेट्टी यांसारख्या कलाकारांनी आपल्या स्टायलिश लूकमध्ये इव्हेंटचा ग्लॅमर वाढवला. या वेळी अनन्या पांडे गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये पोहोचली होती. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील बादलीच्या आकाराच्या पर्सने लक्ष वेधून घेतले.

अनन्याची पर्स पाहून लोक तिची खिल्ली उडवत आहेत. अनन्या इव्हेंटमध्ये पोहोचताच तिची ही पर्स पाहून पापाराझींनी गमतीने ‘ही पर्स आहे की बादली?’ असं विचारलं. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला व लोक त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. ‘एवढ्या पर्समध्ये काय ठेवणार?’ अशी कमेंट एकाने केली, तर दुसऱ्याने, ‘पर्सचा आकार तिच्या संघर्षाएवढा आहे,’ असा टोला लगावला. ‘जाताना यात दाल फ्राय ने,’ अशी कमेंट एका यूजरने केली आहे.

अनन्या पांडेच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती आयुष्मान खुरानाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’ या आगामी चित्रपटात ती दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananya pandey trolled for her bucket purse at event comments over dal fry hrc