‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात विविध ४ कथांची एकत्रित मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या कथेचे शीर्षक ‘मेड फॉर इच अदर’ असे असून यामध्ये अभिनेता अंगद बेदी, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : इस्लाम धर्मासाठी बॉलीवूड सोडणाऱ्या सना खानने दिला बाळाला जन्म, म्हणाली “अल्लाहने आम्हाला…”

‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये नीना गुप्ता यांनी मृणाल ठाकूरच्या आजीची भूमिका साकारली आहे. मृणाल आणि अंगद यांचे लग्न जुळवून देण्यात आजीचा मोलाचा वाटा असतो. याबाबत अंगद बेदीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. अभिनेता नीना गुप्ता यांच्याविषयी सांगताना म्हणाला, “चित्रपटात नीना गुप्ता यांनी त्यांची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. एवढ्या गंभीर विषयावर त्यांच्याइतके सहज काम कोणीही करू शकणार नाही. तुम्ही एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत का? हा डायलॉग त्या एकदम सहज बोलताना दिसतात. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.”

हेही वाचा : आलिया सिद्दिकीने केला नवाजुद्दिनच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “आधी आरोप केलेस आता…”

अंगद पुढे म्हणाला, “त्या प्रत्येक गोष्ट खूप प्रेमाने शिकवतात, कधीच कोणाला त्यांचा राग येऊ शकत नाही. त्यांच्याऐवजी कोणता दुसरा कलाकार असता, तर आम्ही एवढ्या मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद नसला साधता. त्यांच्याबरोबर काम करणे खूप सोपे आहे. भविष्यात नीना गुप्तांबरोबर पडद्यावर रोमान्स करण्यास माझी काहीही हरकत नसेल, असा कोणताही प्रोजेक्ट असल्यास मी काम करण्यास तयार आहे.”

हेही वाचा : Video : गोड प्रेमकहाणीत थरारक ट्विस्ट, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटातील पहिली कथा ‘मेड फॉर इच अदर’ अर्जुन (अंगद बेदी ) आणि वेदाच्या ( मृणाल ठाकूर ) आयुष्यावर बेतलेली आहे. यामध्ये वेदाची आजी ( नीना गुप्ता) त्यांचे लग्न जुळवण्यात मदत करते आणि नातीसा स्त्रीसुखाची जाणीव करून देते. ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angad bedi expressed his desire to romance lust stories 2 costar neena gupta sva 00