‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटातील लघुकथा लैंगिकतेवर भाष्य करणाऱ्या होत्या. चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागाचीही खूप चर्चा झाली. चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमातील एका लघुकथेत नेहा धुपियाचा पती व अभिनेता अंगद बेदी मुख्य भूमिकेत होता.
“मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”
अंगद बेदी, मृणाल ठाकूर व नीना गुप्ता हे त्या लघुकथेचे मुख्य कलाकार होते. यामध्ये अंगद व मृणालचा रोमान्स दाखविण्यात आला होता. दोघांनी बोल्ड सीनही दिले होते. अंगद विवाहित असून नेहा धुपिया त्याची पत्नी आहे. दोघांना दोन अपत्ये आहेत. या चित्रपटातील बोल्ड सीनबाबत नेहाची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल अंगदने सांगितलं आहे. जेव्हा तू पत्नी नेहाला या भूमिकेबद्दल सांगितलं तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया काय होती, ती काय म्हणाली होती? या प्रश्नावर अंगद म्हणाला, “तिला फार आवडलं आणि खूप आनंद झाला. जेव्हा मी तिला कथा सांगितली तेव्हा तिची प्रतिक्रिया सकारात्मक होती.”
सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन; ‘ओपनहायमर’मधील त्या सीनवर भडकले नेटकरी; म्हणाले “लाज वाटली…”
अशा बोल्ड कथा किंवा दृश्ये पाहिल्यावर प्रेक्षकांचा एक वेगळा दृष्टीकोन तयार होतो. तर हे सीन शूट करताना सेटवरील वातावरण कसे होते? असा प्रश्न अंगदला विचारण्यात आला. “असे सीन शूट करण्यासाठी आधी एक इंटिमसी कोच आणि निर्मात्यांकडून एक-दोन लोक असतात. बाकीच्या लोकांना त्या खोलीतून किंवा सेटच्या बाहेर पाठवले जाते, जेणेकरून कोणालाही अनकंफर्टेबल वाटणार नाही,” असं अंगदने ‘नवभारत टाइम्स’ला सांगितलं.