१९९८ मध्ये आलेला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा ‘तेजाब’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील ‘एक दो तीन’ गाण्याने माधुरीला रातोरात स्टार बनवले. आता बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार ‘कबीर सिंग’चे निर्माते मुराद खेतानी या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करणार आहेत.
याआधी या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण आता या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंगला विचारणा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुराद खेतानी आणि त्यांच्या टीमने आता काही कारणास्तव त्यांच्या या निर्णयात बदल केले आहेत. या रिमेकमध्ये जान्हवी कपूरसुद्धा झळकणार असल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा : चाहत्याने विचारला शाहरुख खानला OTP; मुंबई पोलिसांनी ट्वीट करत लिहिलं…
तेजाबच्या रिमेकच्या कलाकारांबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि जान्हवी कपूर ही नवी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळू शकते. रणवीर सिंगचा नुकताच आलेला ‘सर्कस’ फ्लॉप झाल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
जान्हवी कपूर नुकतीच ‘मिली’ आणि ‘गुडलक जेरी’ या चित्रपटात झळकली. चित्रपट फारसे चालले नसले तरी जान्हवीच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ‘तेजाब’सारख्या चित्रपटाचा रिमेक हा नक्कीच बॉलिवूडसाठी एक आव्हान ठरणार असल्याची शक्यता आहे. आजही अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या या चित्रपटाची क्रेझ प्रचंड आहे. त्यामुळे या रिमेकसाठी चित्रपटप्रेमी चांगलेच उत्सुक आहेत.