बॉलिवूडचा एकदम ‘झकास’ आणि चिरतरुण अभिनेते अनिल कपूर यांचा आज ६७ वा वाढदिवस. रणबीरच्या ‘अॅनिमल’मधील बापाची भूमिका असो किंवा आदित्य रॉय कपूरच्या ‘नाईट मॅनेजर’ या वेबसीरिजमधील क्रूर खलनायकाची भूमिका असो अनिल कपूर यांचा उत्साह आणि ऊर्जा सध्याच्या तरुणांनादेखील लाजवणारी आहे. गेली चार दशकं अनिल कपूर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वयातही इतका उत्साह आणि इतका फिटनेस हे नेमकं अनिल कपूर यांना कसं जमतं याविषयी त्यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं होतं. आपण आहोत तसे दिसण्यासाठी अनिल कपूर विशेष फारशी काहीच मेहनत घेत नाहीत हेदेखील त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर गेली कित्येक वर्षं अनिल कपूर यांनी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केलेला नाही. यामागे असं नेमकं काय कारण आहे हे अनिल कपूर यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा – KBC 15: “मुलगा म्हणून…” अभिषेकच्या ‘त्या’ प्रश्नावर बिग बींनी दिलेल्या उत्तराने जिंकली प्रेक्षकांची मनं; स्पर्धकाने शेअर केली आठवण

अनिल कपूर म्हणाले, “ही मी स्वतःला लावलेली शिस्तच आहे. मी तरुण होतो तेव्हा माझे बरेच सहकलाकार मी शूटिंगनंतर सेलिब्रेशन करत नाही म्हणून माझी खिल्ली उडवायचे. पण आयुष्यात आनंदी राहण्यासाठी प्रत्येक दिवशी पार्टी करायलाच हवी असं अजिबात नाही. मला अजूनही शुटींग करायला, आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो. मला वाटतं ते आंतरिक सुखच माझ्या चेहेऱ्यावर दिसतं. मी कधीच माझ्या कामाच्या बाबतीत तडजोड करत नाही.”

पुढे अनिल म्हणाले, “याचा अर्थ असा अजिबात नाही की मी सुट्टी घेत नाही, मला जे आवडेल ते अन्न खात नाही. मी माझ्या पत्नीच्या परवानगीने या सगळ्या गोष्टी करतो. पण एक काळ असा होता की सुरू असलेल्या पार्टीतून अचानक मी गायब व्हायचो, कारण मला सकाळी लवकर उठून शूटिंग जायचं असायचं. जेव्हा मी काम करतो तेव्हा मी माझी झोप आणि माझा आहार याबाबतीत तडजोड करत नाही.”

हेही वाचा – ‘अ‍ॅनिमल’मधून परिणीती चोप्राला का काढलं? संदीप रेड्डी वांगाने केला खुलासा

पुढे आपल्या तंदरुस्तीबद्दल बोलताना अनिल म्हणाले, “कधी काही मलाही वाटतं माझी इतकी सुंदर आणि ठणठणीत तब्येत ही एक दैवी देणगीच आहे. माझे आजोबा किंवा वडील काही नट नव्हते तरी त्यांनी आयुष्यभर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिले. पण मला कधीच बॉडी बिल्डिंग करावंसं वाटलं नाही, फिटनेस हाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवाय तुमचा मेंदूदेखील सकारात्मक आणि निरोगी हवा आणि कायम तुमच्यासमोर भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे हे ध्येय असायला हवं. गेल्या ३५ वर्षात मी कायम माझ्यासमोर काही ना काही ध्येय ठेवलं आहे, निराश कधीच राहू नका, नैराश्य हा मृत्यूसमानच आहे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil kapoor reveals in old interview why he doesnt celebrate his special day avn