काल सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन जल्लोषात साजरा झाला. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून यानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. अभिनेते अनिल कपूर यांनी देखील यानिमित्त एक स्टोरी शेअर केली आणि त्यांनी काम केलेल्या मराठी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला.

अनिल कपूर यांनी ‘हमाल दे धमाल’ या एकमेव मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. या चित्रपटात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केला. काल झालेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त एक स्टोरी शेअर करत ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाले.

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

आणखी वाचा : Photos : नव्या वस्तूंना प्राचीन टच, ‘असं’ आहे अनिल कपूर यांचं घर, पाहा फोटो

अनिल कपूर यांनी त्यांचा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने मला एक आठवण आली ती म्हणजे ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाची. हा माझा आजवरचा पहिलाच मराठी चित्रपट. माझं भाग्य आहे की मला या चित्रपटात काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्याच्या कारकीर्दीतल्या बेस्ट परफॉर्मन्सपैकी हा एक आहे. माझा मित्र लक्ष्मीकांत.. मला त्यांची रोज आठवण येते.”

हेही वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली, “आयुष्यभरासाठीचा…”

आता त्यांची ही इन्स्टाग्राम स्टोरी सध्या खूपच चर्चेत आली आहे. अनिल कपूर यांनी शेअर केलेली स्टोरी लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं म्हणजेच अभिनेता अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनी शेयर केली आहे. ही स्टोरी रिपोस्ट करत त्यांनी अनिल कपूर यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader