अनिल कपूर नेहमीच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. वैयक्तिक आयुष्याबाबत अनिल कपूर फार क्वचितच बोलतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनिल यांनी त्यांची पत्नी सुनीता आणि त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. अनिल कपूर यांची आर्थिक परिस्थिती जेव्हा अगदी सामान्य होती तेव्हा त्यांच्यावर दडपण न आणता सुनीता त्यांना मदत करायची.

मुंबईत एका डिटर्जंट ब्रँडसाठी आयोजित कार्यक्रमात अनिल यांनी सांगितले, “माझ्या आयुष्यात ५० ​​वर्षांपूर्वी जेव्हा मी सुनीताला पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा अर्थातच माझी आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. ती बऱ्याच गोष्टींची काळजी घेत असे आणि अशा प्रकारे आम्ही आमचा भार वाटून घ्यायचो. जिथे पैशांचा प्रश्न उद्भवला तिथे ती स्वत: पुढे आली. आणि हे फक्त घरघुती कामाबद्दल नाही. असा एक काळ होता जेव्हा काही गोष्टी मला परवडत नव्हत्या, परंतु मला हे तिला कधी सांगावे लागले नाही. कधी कधी बाहेर जाताना, एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाताना किंवा डेटवर जाताना तिला माहित असायचं की माझ्याकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत आणि मला कळण्याआधीच ती बिल भरायची.”

Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Anajli Damania on dhananjay Munde
“…आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याच”, भर पत्रकार परिषदेत पुरावे सादर केल्यानंतर अंजली दमानियांची मागणी!
laxmi in hospital
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!
gadchiroli tribal couple
मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा; आदिवासी दाम्पत्याची व्यथा, तीन दिवसांपासून उपाशी, पत्नीचे मंगळसूत्र मोडले
ulta chashma
उलटा चष्मा: कोण म्हणतं गरीब जिल्हा?
R Madhavan wife Sarita thinks he is a fool
“माझ्या पत्नीला वाटतं की मूर्ख आहे”, आर माधवन मराठमोळ्या बायकोबद्दल असं का म्हणाला?
Marathi actress Nivedita Saraf Reaction on Ladki Bahin Yojana
“नुसते पैसे देण्यापेक्षा…”, ‘लाडकी बहीण योजने’वर निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

हेही वाचा… मानसी नाईक पुन्हा एकदा पडली प्रेमात? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “असा कोणीतरी आहे जो…”

त्यांची मुलगी सोनम कपूर म्हणाली, “ती अजूनही कधीकधी बिलं भरते. “आता ती बदला घेतेय.” असं मजेशीरित्या अनिल कपूर म्हणाले. ” मैत्रीत, पार्टनर्समध्ये, विशेषत: पती-पत्नीमध्ये हा समजूतदारपणा असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमचा भार समोरच्या व्यक्तीला कळू न देता तो वाटून घेता तेव्हा ती गोष्ट खूप समाधानकारक असते.”

हेही वाचा… जान्हवी कपूरने घातला बॉयफ्रेंड शिखरच्या नावाचा नेकलेस, फोटो चर्चेत

काही वर्षांपूर्वी त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना अनिल कपूर यांनी ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बेला’ त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं होतं. अनिल म्हणाले होते की, “ती उदारमतवादी कुटुंबातील होती – मॉडेलिंग करिअर असलेली बँकरची मुलगी. मी बेकार होतो! मी कोण आहे किंवा माझा व्यवसाय काय आहे याची तिला काहीच पर्वा नव्हती, याचा तिला काहीच फरक पडत नव्हता. मी चेंबूरला राहत होतो आणि ती नेपियन सी रोडच्या जवळ राहत होती. मला तिच्याइथे बसने पोहोचायला एक तास लागायचा. ती मला ओरडायची की, “नाही.. तू टॅक्सीने लवकर ये” आणि मी म्हणायचो, “अरे माझ्याकडे पैसे नाहीत”, मग ती म्हणायची, “तू फक्त ये ना” आणि ती माझ्या टॅक्सीचे पैसे द्यायची. आम्ही १० वर्षे एकमेकांना डेट केलं – या आयुष्याच्या प्रवासात आम्ही एकत्र पुढे गेलो.”

हेही वाचा… “१९२ किलोच्या रेसलरला उचललं अन्…”, अक्षय कुमारची झाली होती ‘अशी’ अवस्था; सांगितली ‘त्या’ चित्रपटाची आठवण

दरम्यान, अनिल कपूर आणि सुनिता यांनी १९८४ रोजी लग्नगाठ बांधली. ५० वर्षापासून ते एकत्र आहेत. अनिल कपूर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात अनिल कपूर शेवटचे झळकले होते. ‘वेलकम टू द जंगल’ या आगामी चित्रपटाद्वारे अनिल कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Story img Loader