बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. दोघेही ३९ वर्षांपासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. अनिल कपूर आणि सुनीता यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांच्या लग्नाला ३९ वर्षे झाली असली तरी आज त्यांच्या नात्याला ५० वर्षे झाली आहेत. या खास प्रसंगी अनिल कपूर यांनी पत्नी सुनीतासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. अनिल कपूर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अनिल कपूरने यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंबरोबर त्यांनी पत्नी सुनीतासाठी प्रेमपत्रही लिहिले आहे. अनिल कपूर यांनी लिहिले आहे, ‘५० वर्षांच्या आनंदी प्रेमाच्या शुभेच्छा सुनीता! ही प्रेमकथा ५० वर्षांपूर्वी सुरू झाली आणि ती कायम राहील!’ लग्नाच्या ३९ वर्षे आणि ११ वर्षांच्या डेटिंगनंतर तू इतकी समजूतदार कशी राहिलीस, हे मला कधीच समजले नाही. तुझा संयम आणि समर्पण याबद्दल लिहिणे गरजेचे आहे. जवळपास पाच दशकांनंतरही काहीही बदललेले नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आत्ता आणि नेहमी फक्त तूच आहेस!”
अनिल कपूर यांच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. केवळ चाहतेच नाही तर अनेक कलाकारही दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, भूमी पेडणेकर अभिनेता सुनील शेट्टी, यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. याशिवाय दिग्दर्शक करण जोहर, चंकी पांडे आणि तनिषा मुखर्जी यांनी अभिनंदन करत कमेंट केली आहे.