‘गदर’ व ‘गदर २’ हे दोन्ही चित्रपट बॉलीवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहेत. यामध्ये सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण ‘गदर’ चित्रपटासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांची पहिली पसंती सनी देओल नाही तर गोविंदा होता, अशा बातम्या अनेक वर्षांपासून येत आहेत. गोविंदा आणि काजोल या चित्रपटात तारा आणि सकिना यांची भूमिका साकारणार होते, असंही म्हटलं जात होतं. याच चर्चांवर दिग्दर्शक अनिल शर्मांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कतरिना कैफच्या दिराला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटो चर्चेत

आपण गोविंदाला या चित्रपटाची ऑफर कधीच दिली नव्हती, असं शर्मा यांनी म्हटलं आहे. अनिल शर्मा यांनी पुन्हा एकदा ‘गदर’साठी गोविंदाशी संपर्क साधला नव्हता असं ठामपणे सांगितलं आहे. सध्या शर्मा ‘गदर २’ चे यश साजरे करत आहेत. ते ‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “त्या भूमिकेत गोविंदा कसे असू शकतात? तो नेहमी सनी असायला हवा होता.”

यांचं ठरलं? आदित्य रॉय कपूरच्या वहिनीसह इव्हेंटला पोहोचली अनन्या पांडे, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

पुढे शर्मा म्हणाले, “बिचारे गोविंदा, त्यांना लक्षात राहिलं नसेल. मी त्यांच्याबरोबर दुसरं काहीतरी काम करत होतो आणि मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे सनी देओलसाठी एक कथा आहे. त्यांनी मला त्याबद्दल जास्त माहिती विचारली आणि मी सांगितलं. तेव्हा त्यांनी मला म्हटलं की मी या कथेसाठी सनीकडे गेलो ते चांगलं झालं. कारण ते कधीच असा चित्रपट करू शकले नसते.”

अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान एकाला मारलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाली, “मी जे केलं ते…”

“त्यांना वाटलं असेल की मी त्यांना कथा सांगितल्याने, त्यांनी ही भूमिका करावी अशी माझी इच्छा होती. पण ते विसरले की मी सनीला आधीच साइन केले होते, आमची भेट होण्यापूर्वीच करार झाला होता. जसं ‘गदर २’ च्या आधी मी सलमान खानला भेटलो, त्याने मला विचारलं की मी काय करत आहे. मी त्याला गदर २ ची कथा सांगितली आणि तो म्हणाला की हा चित्रपट ब्लॉकबस्टर असेल. तसंच मी गोविंदांशी बोललो होतो. पण कदाचित गोविंदा विसरले असतील. ते मोठे स्टार होते, खूप व्यग्र होते, अनेक चित्रपट करत होते, त्यामुळे ते ही लहानशी गोष्ट विसरले असतील,” असं अनिल शर्मा म्हणाले.

Story img Loader