रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन हे ६०० कोटींच्या घरात गेले असून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ‘अ‍ॅनिमल’ने ७०० कोटींचाही टप्पा पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : आणखी एक रेकॉर्ड मोडीत काढत ‘अ‍ॅनिमल’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच; ११ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकूणच या चित्रपटाबद्दल सेलिब्रिटीजमध्येसुद्धा दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहे. चित्रपटात रणबीरबरोबरच बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या दोघांच्या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. याचबरोबरीने चित्रपटात बॉबीच्या भावाची भूमिका निभावणाऱ्या सौरभ सचदेवा यांचीही जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे.

‘सेक्रेड गेम्स’मधून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या सौरभ यांनी जास्तकरून नकारात्मक भूमिकाच निभावल्या आहेत. याबरोबरच इतरही बऱ्याच चित्रपटात त्यांनी छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत, परंतु ‘अ‍ॅनिमल’मधील छोट्याश्या भूमिकेचा त्यान चांगलाच फायदा झाला असून ‘आज तक’शी संवाद साधताना त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. सौरभ म्हणाले, “मी जेव्हा हा चित्रपट करायचा निर्णय घेतला तेव्हा याला अन् माझ्या छोट्याशा पात्राला इतकी लोकप्रियता मिळेल याचा विचारही केला नव्हता. मी माझं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला. संदीप रेड्डी वांगा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत मी माझ्याकडून त्या भूमिकेवर काम करत होतो अन् माझी ही पद्धत त्यांनाही खूप पसंत पडली.”

सौरभ यांचं काम लोकांना इतकं आवडलं की त्यांनी त्यांची तुलना थेट इरफान व हॉलिवूड स्टार अल पचीनो यांच्याशी करायला सुरुवात केली आहे. याबरोबरच ‘अ‍ॅनिमल’च्या शेवटी एक पोस्ट क्रेडिट सीन आहे ज्यात याच्या पूढील भागाची म्हणजेच ‘अ‍ॅनिमल पार्क’ची झलक दाखवण्यात आली आहे. या पूढील भागाबद्दलही सौरभ यांनी भाष्य केलं आहे अन् या ‘अ‍ॅनिमल पार्क’मध्ये त्यांचं पात्र पाहायला मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

सौरभ म्हणाले, “मलाही या चित्रपटाच्या सीक्वलची आतुरता आहे. खरं सांगायचं तर आम्हालाही याचा सीक्वल बनणार आहे याची कल्पना नव्हती. हा निर्णय अगदी ऐनवेळी घेण्यात आला होता. जेव्हा याचं एडिटिंग पूर्ण झालं तेव्हा आम्हाला समजलं की याचा सीक्वलही येणार आहे. एक दिवस मला दिग्दर्शकाने रणबीरबरोबर शूटसाठी बोलावलं होतं, तेव्हा मला याचा सीक्वल बनू शकतो याचा अंदाज आला होता. अर्थात यात माझं पात्र असणार की नाही हे मी इतक्या खात्रीने सांगू शकत नाही. कारण याआधी ‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनच्या बाबतीत आधीच निराशा पदरी पडली आहे. जर याचा सीक्वल बनणार असेल तर नक्कीच त्यामध्ये मला हे पात्र एका वेगळ्या पद्धतीने पुन्हा साकारायला नक्की आवडेल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal actor saurabh sachdeva speaks about his role in sequel animal park avn