रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. शिवाय यामध्ये रणबीरच्या मेव्हण्याची भूमिका निभावणाऱ्या सिद्धांत कर्णिकचं काम लोकांना पसंत पडलं आहे.नुकतंच सिद्धांतने ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना या चित्रपटाबद्दल, आपल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : ‘द आर्चीज’च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान काजोलच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकने वेधलं सर्वांचं लक्ष; शेअर केले खास फोटो

इतकंच नव्हे तर या मुलाखतीदरम्यान तृप्ती डीमरीच्या बूट चाटण्याच्या सीनबद्दलही सिद्धार्थने भाष्य केलं आहे. त्याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “एक प्रेक्षक म्हणून तो सीन पाहताना मी चांगलाच अस्वस्थ झालो, पण त्याचवेळी मला दिग्दर्शकाच्या धाडसाची दाद द्यावीशी वाटली. एखाद्या माणसाची मानसिकता त्यावरून स्पष्ट होते, तो एक चांगला माणूस आहे पण त्याबरोबरीनेच त्या पात्राच्या काही ग्रे शेड्सही आहेत. मी जेव्हा तो सीन पाहिला तेव्हा मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो, पण आता मला जाणवतंय की संदीप सरांनाही तेच हवं होतं, प्रेक्षकांनी हबकून प्रतिक्रिया देणंच अपेक्षित होतं.”

चित्रपटावर जोरदार टीका होत असतानाही ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात ५०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाला मिश्र प्रतिक्रिया मिळत असल्या तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. रणबीरशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ति कपूर, बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आता प्रेक्षक याच्या पुढील भागाची म्हणजेच ‘अ‍ॅनिमल पार्क’ची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal actor siddhant karnick got unsettles when he saw shoe lick scene of tripti dimri avn