संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचत आहे. पण या चित्रपटातील काही दृश्यांवर जोरदार टीकाही होत आहे. या चित्रपटातील हिंसाचार आणि महिलांना दिलेली वागणूक याबद्दल नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. चित्रपटात रणबीर कपूरच्या भाऊजींची भूमिका करणार्या सिद्धांत कर्णिकने यातील एका सीनबद्दल त्याचं मत मांडलं आहे. ज्या सीनमध्ये रणबीरचे पात्र रणविजय गीतांजलीच्या ब्राची स्ट्रॅप ओढतो, ज्यामुळे तिला त्रास होतो.
‘बॉलीवूड नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतला प्रेक्षक म्हणून या दृश्याबद्दल त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तो म्हणाला, “मला जाणवलं की गीतांजलीच्या ब्राची पट्टी ओढून रणबीरचे पात्र त्याच्यातील विचित्रपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पाहा मासोसिझम आणि सॅडिझम नावाच्या संज्ञा आहेत, ज्या लैंगिक प्रवृत्तींमध्ये वापरल्या जातात. यावरून रश्मिकाचे पात्र एक मासोचिस्ट असू शकते हे दिसून आले. म्हणजेच तिला रणविजयने केलेले अशा प्रकारचे कृत्य मान्य होते.”
सिद्धांत पुढे म्हणाला, “प्रेक्षक म्हणून आम्हाला वाटतं की जे घडत होतं ते चुकीचं आहे. पण प्रत्यक्षात सिनेमात मात्र ते त्या दोन पात्रांमधील दृश्य आहे आणि ते त्यांच्यासाठी योग्य आहे. मग आपण याबद्दल चूक की बरोबर हे मत का देत आहोत? चित्रपट आपल्याला त्या पात्रांबद्दल सांगत आहेत आणि पात्रांना काय आवडतं, ते त्यांच्यावर अवलंबून आहे.”
यापूर्वी चित्रपटातील एका दृश्याबद्दल सिद्धांतने त्याची प्रतिक्रिया दिली होती. रणबीरच्या पात्राने तृप्तीच्या पात्राला त्याच्यावरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याचा जोडा चाटायला सांगितलं होतं. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत हे दृश्य पाहून आपण अस्वस्थ झाल्याचं सिद्धांतने सांगितलं होतं. “या दृश्यातून त्या माणसाची मानसिकता दिसून येते. खरं तर तो चांगला आहे पण त्याच्यात कुठेतरी अशा गोष्टीही दडल्या आहेत. खंर तर रणविजयला खलनायक बनण्यासाठी ही एक ओळ होती. असे दृश्य दाखवणं सोपं नाही. मला ते दृश्य पाहून अस्वस्थ वाटलं होतं. पण आता जेव्हा मी त्याबद्दल विचार करतो, तेव्हा वाटतं की ते दृश्य खूप चांगले होते, कारण ते तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडते,” असं सिद्धांत कर्णिक म्हणाला होता.