रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं त्याहून कित्येकपटीने याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीकाही झाली. विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य अशा बऱ्याच गोष्टींचा ‘अ‍ॅनिमल’मध्ये भडिमार असल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. आता या चित्रपटानंतर संदीप लवकरच सलमान खानबरोबर काम करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. संदीप यांनी नुकतीच सलमान खानला एका चित्रपटासाठी विचारणा केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : “आमिरने तर बलात्काराचा…” ‘अ‍ॅनिमल’फेम संदीप रेड्डी वांगा यांचं किरण रावच्या टिकेला सडेतोड उत्तर

मीडिया रीपोर्टनुसार संदीप यांनी पुढील एका डार्क अॅक्शन थ्रिलर चित्रपटासाठी सलमान खानला विचारलं आहे. नुकतंच संदीप यांनी एका मुलाखतीदरम्यान सलमानबरोबर काम करायची इच्छा व्यक्त केली होती. या चित्रपटात सलमान एकदाम वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप या गोष्टीची पुष्टी अजूनही कुणी केलेली नाही.

याबरोबरच सध्यातरी संदीप आणि सलमान एकत्र येतील अशी शक्यता फार कमी आहे. कारण ‘अ‍ॅनिमल’नंतर संदीप रेड्डी वांगा हे त्यांच्या आगामी ‘स्पिरीट’ या चित्रपटावर काम करणार आहेत. याबरोबरच ते अल्लू अर्जुनबरोबरही चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे. शिवाय हे पूर्ण झालं की लवकरच ते आणि रणबीर ‘अ‍ॅनिमल पार्क’वर काम सुरू करणार आहेत. तर सलमान खान लवकरच त्याच्या आगामी ‘ द बूल’चं चित्रीकरण सुरू करणार आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन कॅक्टस’वर बेतलेला असणार आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत असून ‘शेरशाह’फेम दिग्दर्शक विष्णु वर्धन याचं दिग्दर्शन करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal director sandeep reddy vanga will work with salman khan on his next avn