संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाची जितकी चर्चा आहे, तितकीच चर्चा या चित्रपटातील एका अभिनेत्रीची आहे, ती म्हणजे तृप्ती डिमरी. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरबरोबर इंटीमेट सीन देणारी तृप्ती आता नॅशनल क्रश झाली आहे. तिला ‘भाभी २’ बोललं जातं. अशा या तृप्तीची सध्या वैयक्तिक आयुष्याविषयी अधिक चर्चा रंगली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या भावानंतर तृप्ती एका श्रीमंत उद्योगपतीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या अफेअरबाबत गेल्या काही दिवसांपासून अधिक बोललं जात आहे. तृप्तीने अनुष्का शर्माचा भाऊ कर्नेश शर्माला डेट केलं आहे. जेव्हा तिने कर्नेशच्या निर्मितीत तयार झालेल्या ‘बुलबुल’ चित्रपटात काम केलं. तेव्हापासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ‘बुलबुल’ या चित्रपटानंतर तृप्तीने कर्नेशच्या ‘कला’मध्ये देखील काम केलं. त्यानंतर सातत्याने दोघं अनेक पार्टीजमध्ये दिसले. एवढंच नाही तर दोघांचे रोमँटिक फोटो देखील व्हायरल झाले होते. पण दोघांनी कधी रिलेशनशिपबाबत सांगितलं नाही. काही महिन्यांपूर्वीच तृप्ती आणि अनुष्काचा भावाचा ब्रेकअप झाला. ब्रेकअप होण्यामागचं नेमकं कारण काय होतं? याचा खुलासा झाला नाही. पण आता कर्नेशनंतर तृप्ती डिमरीचं नाव श्रीमंत उद्योगपतीशी जोडलं गेलं आहे.

Bollywood actress Ayesha jhulka wild card entry in celebrity masterchef
Celebrity MasterChef मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आता किचनमध्ये लावणार तडका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
madhuri dixit was not first choice for hum aapke hain koun
माधुरी दीक्षित नव्हे तर ‘ही’ अभिनेत्री होती ‘हम आपके हैं कौन’साठी पहिली पसंती! दिग्दर्शकाचा ३० वर्षांनी खुलासा, म्हणाले…
Zahan Kapoor receives an IMDb STARmeter
करीना कपूरच्या चुलत भावाचा दमदार अभिनय, ‘ब्लॅक वॉरंट’साठी मिळाला ‘हा’ पुरस्कार
Aishwarya Rai Bachchan special post for husband abhishek bachchan
ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पती अभिषेक बच्चनसाठी केली खास पोस्ट, कॅप्शनमध्ये म्हणाली…
amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”

हेही वाचा – Premachi Goshta: कोळी कुटुंबाने मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्यात आणली रंगत, प्रसाद सांगून दिली…

अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या उद्योगपती सॅम मर्चेंटला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अलीकडेच अभिनेत्रीने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये तृप्ती सॅमबरोबर पाहायला मिळत आहे. दोघांनी सारख्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

हेही वाचा – Video: ‘नवा गडी नवं राज्य’ २३ डिसेंबरला घेणार प्रेक्षकांचा निरोप; शूटिंगचा शेवटचा दिवस कलाकारांनी ‘असा’ केला साजरा

याच फोटोमुळे तृप्ती डिमरीच्या दुसऱ्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. सॅम हा एक उद्योगपती असून गोव्यातील एका रेस्टॉरंटचा तो मालक आहे. पण खरंच तृप्ती आणि सॅम एकमेकांना डेट करतायत? की या फक्त अफवा आहेत? हे आता येत्या काळात स्पष्ट होईल.

Story img Loader