रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.

चित्रपटाचं जेवढं कौतुक झालं त्याहून कित्येकपटीने याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीकाही झाली. विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य अशा बऱ्याच गोष्टींचा ‘अ‍ॅनिमल’मध्ये भडिमार असल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. नुकतंच संदीप यांनी एका मुलाखतीदरम्यान या टीकाकारांवर अन् प्रेक्षकांच्या मानसिकतेवर भाष्य केलं आहे. ‘कबीर सिंग’मध्ये शाहिदच्या पात्राला प्रीतीशी ज्याप्रकारे वागल्याचा पश्चात्ताप झाला असता अन् शेवटी तो एकटाच राहिला असता तर ते लोकांना जास्त आवडलं असतं. असं संदीप रेड्डी यांचं म्हणणं आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट

आणखी वाचा : “मी चालत होते अन् मागून कुणीतरी माझ्या…”, भूमी पेडणेकरने सांगितला वयाच्या १४ व्या वर्षी आलेला ‘तो’ भयानक अनुभव

लोक त्यांचे अजेंडा दुसऱ्यांवर लादू पाहतात अन् याचीच संदीप यांना प्रचंड चीड आहे. ‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना संदीप याविषयी म्हणाले, “चित्रपटाच्या शेवटी हीरो हा स्वतःच्या चुका कबूल करून एक भल मोठं लेक्चर देतो हे लोकांना पाहायचं असतं. कबीर सिंगमध्ये कबीरने प्रीतीबरोबर जे चुकीचे वर्तन केले त्याची जाणीव कबीरला होणं आवश्यक होतं, प्रीतीने त्याच्याकडे पुन्हा जायलाच नको होतं असं बऱ्याच लोकांचं मत होतं. ‘अ‍ॅनिमल’च्या बाबतीतही लोकांना तेच अपेक्षित होतं. त्यातील रणविजयचे वडील कॅन्सरशी झुंजत आहेत, पत्नी आणि मुलं त्याला सोडून गेली आहेत, त्याच्या स्वतःच्या तब्येतीची पुरेवाट लागली आहे आता लोकांना आणखी काय हवंय, हीरोला मारून टाकायचं का?”

पुढे संदीप म्हणाले, “लोकांना त्यांच्या मनासारखा क्लायमॅक्स पाहायला मिळाला नाही की ते अस्वस्थ होतात ही फार मोठी समस्या आहे. एखादा चित्रपट पाहताना तुमचा वैयक्तिक अजेंडा आड येत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही, मग जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार’सारखा चित्रपटही प्रेक्षकांना रटाळ, टुकार वाटू शकतो.” ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर व रश्मिकासह बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डीमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.