रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होताना दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. खासकरून बॉबीचे पात्र अब्रार हक याच्या भोवती बरीच चांगली आणि वाईट चर्चा होताना बघायला मिळत आहे.

Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण
Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”

आणखी वाचा : “चांगले कपडे घ्यायची ऐपत…” बिग बींनी दिवाळखोरी जाहीर केल्यानंतरच्या काळाबद्दल अभिषेक बच्चन स्पष्टच बोलला

इतकंच नव्हे तर बॉबी देओलचे पात्र मुस्लिम दाखवल्यावरुनही प्रचंड टीका होत आहे. अल्पसंख्याकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने बऱ्याच लोकांनी यावर टीका केली आहे. हे पात्रं मुस्लिम दाखवणं, त्याच्या तीन बायका अन् आठ मुलं हे चित्र दाखवण्याची काय गरज होती?असा सवालही बरेच लोक करताना दिसत आहेत. याच प्रश्नाला चित्रपटाचे सहनिर्माते आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे बंधु प्रणय रेड्डी वांगा यांनी चोख उत्तर दिलं आहे.

नुकतंच एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रणय रेड्डी वांगा यांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “आम्ही तीन बायका असलेला, ८ मुलं असलेला खलनायक दाखवला अन् तो अल्पसंख्याकांच्या धर्मातील असल्याने लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. गेल्या २०-३० वर्षांपासून चित्रपटात जेव्हा कपाळावर टिळा लावलेला हिंदू खलनायक दाखवला जायचा तेव्हा कुणीच जाब विचारला नाही. मुस्लिमांची ओळख अल्पसंख्याक अशी ओळख आहे केवळ म्हणूनच काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत.”

Story img Loader