रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर व रश्मिका मंदाना, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री तृप्ती डिमरीने.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा-

‘अ‍ॅनिमल’ तृप्तीने झोया नावाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तृप्तीची भूमिका छोटीशी असली तरी आपल्या दमदार अभिनयातून तिने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले होते. या चित्रपटामध्ये तृप्तीला भाभी २ असंही म्हटले जात आहे. आता ‘अ‍ॅनिमल’ नंतर तृप्ती डिमरीच्या हाती आणखी एक मोठा प्रोजक्ट लागला आहे. तृप्ती आता लवकरच अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर ‘आशिकी ३’ चित्रपटात झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘आशिकी ३’ या चित्रपटाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. गेल्या वर्षी कार्तिक आर्यनने अनुराग बसूच्या ‘आशिकी ३’ मध्ये काम करण्यास होकार दिला असल्याची बातमी समोर आली होती. ‘आशिकी ३’ मध्ये कार्तिकमध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुक्ता लागली होती. सुरुवातीला अभिनेत्री तारा सुतारिया या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आशिकी ३’ मध्ये कार्तिक आर्यनबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार असल्याची बातमी समोर आली आहे. लवकरच ‘आशिकी ३’ च्या शुटींगला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ‘आशिकी ३’ मधील मुख्य अभिनेत्रीच्या नावाबाबत चित्रपट निर्माते किंवा तृप्ती डिमरीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा- Video: अरबाज खानच्या लग्नाच्या २ दिवसांनंतर एक्स गर्लफ्रेंड जॉर्जियाचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “खूपच रडली…”

राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांचा सुपरहिट चित्रपट ‘आशिकी’ १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. आशिकी चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. २०१३ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग ‘आशिकी २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची जोडी चांगलीच गाजली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता या फ्रेन्चायझीमधील तिसरा भाग ‘आशिकी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal star aka bhabhi 2 triptii dimri work with bollywood actor kartik aaryan in aashiqui 3 reports dpj