अभिनेत्री अंकिता लोखंडेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ती सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. अंकितानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. अंकितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा कायमच आदर करतात. एकदा तरी भन्साळी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी, असं बऱ्याच कलाकारांचं स्वप्न असतं. याच पार्श्वभूमीवरअभिनेत्री अंकिता लोखंडेनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. अंकितानं तिचा पती विकास जैन आणि संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देत अंकिता लिहिते, “आदरणीय संजय सर, या क्षणी मी खूपच भारावून गेली आहे. मला आता जे काही वाटतंय , ज्या काही भावना माझ्या मनात दाटून आल्या आहेत, त्या व्यक्त करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडत आहेत. तुमची तुमच्या कामाप्रति असलेली निष्ठा, तुमचा दृष्टिकोन, आतापर्यंतचा तुमचा या इंडस्ट्रीतला प्रवास या सगळ्यामुळे मला तुमच्याकडून काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.”

हेही वाचा-Video : भावाच्या रक्षणासाठी काहीही, आलिया भट्टच्या बहुचर्चित ‘जिगरा’चा टीझर ट्रेलर प्रदर्शित; स्टंट्स आणि अ‍ॅक्शन…

“आज वेळात वेळ काढून भेटल्याबद्दल आणि माझ्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद! आजचा हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुमचं मिळणारं मार्गदर्शन आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास या सगळ्यामुळे माझ्यातली अभिनेत्री आकार घेत आहे. याबद्दल मी तुमची कायम ऋणी आहे. या इंडस्ट्रीत स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही, पण माझ्या प्रतिकूल परिस्थितीत तुमचे विचार मला पुढे जाण्यासाठी प्रभावित करतात. संजय सर, मला तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो”, अशा शब्दांत अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अभिनेता संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करीत, “संदीप तू, नेहमी माझ्या पाठीशी कायम असतोस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार!”, अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा-शाहरुख खानच्या घरच्या बाप्पाला पाहिलंत का? अभिनेत्याने फोटो शेअर करत दिल्या चाहत्यांना शुभेच्छा; म्हणाला, “आपल्या सर्वांना…”

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात अंकिता झळकणार आहे का? याबाबतची माहिती सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande express her feeling about sanjay leela bhansali actress share photo on social media tsg99