अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहे. याशिवाय ती मुख्य भूमिकेत असलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अंकिता वीर सावकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाच्या प्रीमियरला अभिनेत्रीच्या संपूर्ण कुटुंबाने उपस्थिती लावली होती. यावेळी अंकिताच्या सासूबाई पुन्हा एकदा मीडियासमोर आल्या. यावेळी त्या अभिनेत्रीबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या घरात यावेळी अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसह सहभागी झाली होती. या दोघांमध्ये शोमध्ये टोकाचे वाद चालू होते. यावर अभिनेत्रीच्या सासूबाईंनी अनेकदा प्रतिक्रिया देत सुनेला भर नॅशनल टेलिव्हिजनवर दोषी ठरवलं होतं. एवढंच नव्हे तर दोघांच्या लग्नाला आमचा विरोध होता असंही त्या म्हणाल्या होत्या. यामुळे विकीच्या आईला सर्वत्र ट्रोल करण्यात येत होतं. परंतु, ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्यावेळी मात्र विकीच्या आईची भूमिका बदलली होती.

आधी विकी जैन जिंकूदे म्हणणाऱ्या सासूबाईंनी अंकिताचं तोंडभरून कौतुक करत सूनेला पाठिंबा दिला होता. असंच चित्र पुन्हा एकदा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या प्रीमियरला पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : ऐश्वर्या नारकरांनी होळीनिमित्त बनवला खास पदार्थ; व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण रेसिपी; नेटकरी म्हणाले…

सुनेचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या सासूबाईंना पापाराझींनी घेरलं होतं. सध्या रंजना जैन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पापाराझींनी त्यांना चित्रपट कसा वाटला व एकदंर चित्रपटाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? असा प्रश्न अभिनेत्रीच्या सासूबाईंना विचारला होता.

हेही वाचा : “अजित पवारांना गुरगुरताना बघितलंय पण, अमित शाहांपुढं…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “लवकरच…”

“मला अंकिता नेहमीच आवडते, मला तिच्यासारखीच सून हवी होती. आमची अंकिता खरंच ए वन आहे.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या सासूबाईंनी माध्यमांसमोर दिली आहे. दरम्यान, अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande mother in law ranjana jain loved her in swatantrya veer savarkar movie watch video sva 00