अंकिता लोखंडे ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये कंगना राणौतबरोबर ‘मणिकर्णिका’ चित्रपटातही काम केलं होतं. पण, त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. तसेच ती काही काळापासून टीव्ही मालिकांपासूनही दूर आहे. पण आता बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची खंत अंकिता लोखंडेने व्यक्त केली आहे.
अंकिता लोखंडेने ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात कंगना रानोतबरोबर काम केलं होतं. या चित्रपटात तिने ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारली होती. तिची भूमिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण, त्यानंतर मात्र तिला पुन्हा अशी भूमिकाच ऑफर झाली नाही. ‘बॉलिवूड लाईफ’च्या रिपोर्टनुसार, अंकिताने सांगितलं की, तिचा गॉडफादर नाही. ती टॅलेंटेड आहे, पण नकार द्यायला तिच्याकडे कामच येत नाही.
ती म्हणाली, “मार्केट खूप वेगळे आहे आणि लोक म्हणतात की त्यांना चांगल्या ऑफर्स मिळत नाहीत, माझ्या बाबतीत असं काहीही झालं नाही. माझ्याकडे अशी कोणतीही ऑफर नाही जी मी नाकारू शकेन आणि मी कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही.”
मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…
अंकिता लोखंडेला २००९ मध्ये आलेली मालिका ‘पवित्रा रिश्ता’मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती दिवंगत अभिनेता सुशात सिंह राजपूतबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्याशी ब्रेकअपनंतर अंकिताने विकी जैनशी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.