‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट आज (२२ मार्च रोजी) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रणदीप हुड्डा अभिनीत या चित्रपटात अंकिता लोखंडेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. गुरुवारी संध्याकाळी कलाकारांसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच ‘बिग बॉस’मध्ये झळकलेल्या अंकिताने शोमधील काही स्पर्धकांना या स्क्रीनिंगसाठी बोलावलं होतं. ‘बिग बॉस’मधील स्पर्धक अभिषेक कुमार आणि फिरोजा (खानजादी) यांच्याबरोबर अंकिता लोखंडेने या स्क्रीनिंगला उपस्थिती दर्शवली होती. या तिघांना एकत्रित चित्रपटगृहात जाताना पाहून पापाराझी त्यांच्या मागे मागे गेले. काही जण म्हणाले, “चला चला आत जाऊ.” पापाराझी आत जाणार तेवढ्यातच अंकिताने त्यांना अडवलं आणि म्हणाली, “तुम्ही बाहेर निघा, आत चित्रपट सुरू आहे आणि तुम्ही असे आत येताय, हे तुम्ही खूप चुकीचं करताय; थोडं तरी भान राखा.”

अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंकिता पापाराझींवर भडकताना दिसली. “अंकिता बरोबर बोलतेय”, “अंकिता तिच्या जागेवर योग्य आहे”, अंकिताची बाजू मांडत चाहत्यांनी अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा… ‘बटरफ्लाय बटरफ्लाय’ गाण्यावर थिरकले वैभव मांगले, भार्गवी चिरमुलेसह मराठी कलाकार; VIDEO व्हायरल

दरम्यान, अंकिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अंकिताचा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ आज (२२ मार्च) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अंकिताने वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा याने केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita lokhande shouted on paparazzi at swatantra veer savarkar film screening dvr