अंशुला कपूर ही बोनी कपूर व त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण आहे. ती अभिनेत्री नसली तरी फॅशनविश्वात सक्रिय आहे. ती जाहिराती करते, मॉडेलिंग करते. अंशुला खूप लहान असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आता तिने घटस्फोटानंतर लोक तिच्या कुटुंबाबद्दल ज्या गोष्टी बोलत होते, त्याचा खुलासा केला आहे. बोनी व मोना यांचं लग्न १९८३ मध्ये झालं आणि १९९६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

अंशुला कपूर तिचे वडील बोनी कपूर, काका अनिल कपूर आणि संजय कपूर यांच्या सानिध्यात मोठी झाली. नंतर तिचा भाऊ अर्जुन कपूर आणि चुलत भावंडं सोनम, रिया आणि हर्षवर्धन यांनीही चित्रपटांमध्ये काम केलं. आता, तिच्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूर अभिनेत्री आहेत. एका प्रसिद्ध कुटुंबात राहण्याचे फायदे आहेत, मात्र त्याचबरोबर अंशुलाला हेही समजलं की बाहेरच्या लोकांना तिच्या घरात काय चाललंय हे माहीत असतं. त्यामुळे जेव्हा तिचे आई-वडील मोना व बोनी कपूर वेगळे झाले तेव्हा हा विषय बाहेरच्या जगासाठी चर्चेचा होता. अंशुलालाही त्यावेळी लोकांनी तिच्या कुटुंबाबाबत केलेल्या टिप्पण्यांचा सामना करावा लागला.

हेही वाचा – “मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल अंशुला म्हणाली…

आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यावर अंशुलासाठी आईच जग होती. घटस्फोटानंतर ती कशी मोठी झाली, याबाबत तिने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “९० च्या दशकात मी वाढले. माझे आई-वडील वेगळे झाल्यावर काय बोलावं हे कोणालाही कळत नव्हतं,” असं अंशुला म्हणाली. “लोक कौटुंबिक मूल्ये, माझे संगोपन या गोष्टींबद्दल बोलू लागले. माझ्यावर याचा परिणाम झाला आणि मी हे न्यू नॉर्मल काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते,” असं अंशुलाने सांगितलं.

हेही वाचा: Bigg Boss फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाच्या नामकरण सोहळ्याला ३० हजार लोकांची उपस्थिती

आईने केला सांभाळ

कपूर कुटुंबात कशी वाढली, याबद्दल बोलताना अंशुला म्हणाली की त्यांचं एकत्र कुटुंब होतं आणि आजी घर चालवायची. “अर्थात बाबा काम करत होते, आई काम करत होती, संजय काका काम करत होते. शेवटी जेव्हा आई त्या घरातून बाहेर पडली तेव्हा आईला कणखर बनून एकटीला सगळी जबाबदारी घ्यावी लागली,” असं अंशुला म्हणाली. तिने तिच्या दिवंगत आईचं खूप कौतुक केलं. “ती काळजी घेणारी, प्रेम करणारी, आमच्या सगळ्या समस्या सोडवणारी आणि कमावणारी होती. आमचे आई व बाबा तीच होती. आमची काळजी घ्यायला जणू तिला १० हात होते,” असं अंशुला म्हणाली. मोना कपूर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यावर बोनी यांनी अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केलं. त्यांना जान्हवी व खुशी या दोन मुली झाल्या.

Anshula Kapoor on parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
कपूर कुटुंबीय

हेही वाचा – फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट

आईचा आमच्यावर विश्वास होता – अंशुला

अंशुला व तिचा मोठा भाऊ अर्जुन कपूर दोघांच्या वयात सहा वर्षांचे अंतर असूनही आईने दोघांसाठी कधीही वेगळे नियम केले नाहीत, असं तिने सांगितलं. “तिचा आमच्यावर विश्वास होता. जेव्हापर्यंत आम्ही घरी यायचो नाही, तेव्हापर्यंत ती कधीच झोपायची नाही. आम्हाला आमच्या सगळ्या प्लॅन्सबद्दल तिला सांगावं लागायचं. तो (अर्जुन) मुलगा आहे व मी मुलगी आहे म्हणून आमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या नव्हत्या”, असं अंशुला म्हणाली. अर्जुन पुरुष असल्याने नाही तर माझा मोठा भाऊ असल्याने त्याने काळजी घेणं अपेक्षित होतं, असंही अंशुलाने नमूद केलं. मोना कपूर यांचं २०१२ मध्ये निधन झालं.