यंदाच्या ‘बिग बॉस १६’मध्ये दिग्दर्शक साजिद खानच्या उपस्थितीवरून बराच वाद झाला आणि या वादाची आणखी जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिच्यामुळे. मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदचा शर्लिनने जोरदार विरोध केला. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. आताही ती अशाच एका वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) कॅम्पसमधील ब्राह्मणविरोधी स्लोगन्सबद्दल शर्लिन चोप्राने ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.
JNU ही अशी संस्था आहे ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाच्या निमित्ताने वादाच्या भोवऱ्यात सापडली असते. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देण्यात आल्या होत्या आणि आता पुन्हा याच विद्यापिठाच्या आवारात भिंतींवर ब्राह्मण विरोधी स्लोगन्स लिहिलेली आढळल्याने याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
आणखी वाचा : आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ ऑस्करसाठी सज्ज; राजामौलींच्या ‘RRR’शी होणार स्पर्धा
शर्लिन चोप्राने हे फोटो शेअर करत याबद्दल खंत व्यक्त केली आहे. फोटोमध्ये तिथल्या भिंतींवर, “ब्राह्मणांनो आम्ही तुमच्यामागेच येत आहोत, इथून निघून जा, शाखेत परत जा.” अशा भाषेत घोषणा लिहिल्याचे दिसत आहेत. हे फोटोज शेअर करत शर्लिनने ट्वीटमध्ये लिहिलं की, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्राह्मणांनी बलिदान दिलं नाही का? मंगल पांडे, कॅप्टन मनोज पांडे, वीर सावरकर, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई हे ब्राह्मण नाहीत का? भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या JNU मधील मनोवृत्तीवर केंद्रीय सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे.”
शर्लिन चोप्राच्या या पोस्टवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘या लोकांमध्ये तोंडावर बोलायची हिंमत नाही’ असं एका यूझरने कॉमेंट करत लिहिलं आहे. तर काही लोकांनी शर्लिनच्या या पोस्टवरून तिलाच ट्रोल केलं आहे. शर्लिनच्या सोशल मीडियावरील प्रतिमेमुळे तिला या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. JNU मधील या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.