टीव्हीवरील सारेगामपा या शोमधून संगीतकार अनु मलिक पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या शोच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. हा प्रसंग त्यांच्या आईच्या निधनाबद्दल होता. जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा मी लोकांचं मनोरंजन करत होतो, असं अनु मलिक म्हणाले.

२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”

“मी ४७ वर्षांचा आहे आणि मी माझ्या करिअरची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षी केली होती. पण तरीही मी तितकीच मेहनत करतो. अनेकवेळा मी थकतो, पण नंतर उठून कामाला लागतो. शेवटी आयुष्य म्हणजे पुढे जाणे होय. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेचा भाग बनणे कठीण आहे, परंतु तुम्हाला ते करावंच लागेल. आजही अरिजित, सोनू निगम सारखे मोठे गायक आहेत, त्यांच्या नंतर नवे गायक येत आहेत जे चांगले काम करत आहेत, पण जे नवीन गायक येतील त्यांना खूप मेहनत करावी लागेल आणि स्पर्धेत उतरावे लागेल. ५ वर्षांपूर्वी माझ्या ‘मोह मोह के धागे’ या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले. जरा कल्पना करा, मी ऐंशीच्या दशकापासून काम करत होतो, पण मला २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. माझ्यापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीसमोर मला किती मेहनत करावी लागली असेल?,” असं अनु मलिक संगीताच्या क्षेत्रात कराव्या लागत असलेल्या मेहनतीबद्दल ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना म्हणाले.

प्रेम विवाह करूनही पत्नीपासून वेगळे का राहतात नाना पाटेकर? कोण आहेत त्यांच्या पत्नी? वाचा

संगीतकार, गायक व परीक्षकांना अनेकदा वैयक्तिक त्रास बाजुला ठेवून काम करावं लागतं, तुम्हाला अशा परिस्थितीतून जावं लागलंय का? असा प्रश्न अनु मलिक यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, “होय, असं बरेचदा झाले आहे. पण एकदा एक अतिशय दुःखद परिस्थिती उद्भवली होती, जेव्हा माझ्या आईचे निधन झालं आणि मला शोसाठी जावं लागलं. मी घरी माझ्या पत्नी आणि मुलांशी बोललो आणि मग मी जायचं नसतानाही तो शो करायला गेलो. माझ्या आईचं निधन झालं होतं आणि मी मंचावरून लोकांचं मनोरंजन करत होतो. मी शोमध्ये माझे अश्रू लपवून हसत होतो आणि दुसरीकडे माझ्या आईवर अंतिम संस्कार केले जात होते.” दरम्यान, अनु मलिक यांच्या आईचं २५ जुलै २०२१ रोजी निधन झाले होते.

“कोविड नंतर काळ खूप बदलला आहे. आज प्रत्येकजण लढाई लढत आहे. स्पर्धा खूप वाढली आहे. कोविडने आपल्याला खूप काही शिकवले आहे. मी नवीन कलाकारांना सांगेन की त्यांच्या प्रतिभेवर विश्वास ठेवा आणि मेहनत सोडू नका,” असं अनु मलिक म्हणाले.