‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत होता. आता या चित्रपटावरून वाद सुरू आहे. या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट असे म्हणून या चित्रपटात करण्यात आलेले दावे खोटे आहेत, असे म्हणत अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता ‘द केरला स्टोरी’च्या वादावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुदीप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले, त्यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. काही जण या चित्रपटाचे कौतुक करीत आहेत तर दुसरीकडे काही जण या चित्रपटावर टीका करीत आहेत. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटाचे स्क्रीनिंग थांबवण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या सगळ्यांवर आता अनुपम खेर यांनी त्यांचे मत मांडले आहे.
‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला तेच लोक विरोध करीत आहेत, ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध केला होता. हे ते चेहरे आहेत, जे अशा प्रकारच्या चित्रपटांना विरोध करीत आहेत आणि आपण त्यांना अनेक ठिकाणी पाहू शकतो. सीएएचा विरोध असो, शाहीन बागचा विरोध असो किंवा जेएनन्यूमधील विरोध असो… हे तेच चेहरे आहेत, ज्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध केला होता. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे हे मला माहीत नाही पण या लोकांकडे लक्ष न देणेच चांगले, असे मला वाटते.”
पुढे ते म्हणाले, “मी अजून हा चित्रपट पाहिला नाही पण सत्य परिस्थितीच्या जवळ जाणारे चित्रपट बनवले जात आहेत आणि प्रेक्षक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. याचबरोबर ज्यांना हा चित्रपट प्रोपगंडा चित्रपट वाटतो ते त्यांना योग्य वाटेल अशा विषयांवर चित्रपट बनवण्यासाठी मोकळे आहेत. त्यांना कोणीही रोखलेले नाही.” आता अनुपम खेर यांचे हे बोलणे खूप चर्चेत आले आहे.