अभिनेता अनुपम खेर हे बॉलीवूडमधील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहेत. दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. अनुपम सध्या ‘विजय ६९’च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. याच ‘विजय ६९’च्या सेटवर घडलेल्या एका धक्कादायक गोष्टीचा खुलासा खुद्द अनुपम खेर यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- शाहरुखच्या ‘या’ गोष्टीचा सुहाना खानला होता प्रचंड तिरस्कार; म्हणाली, “माझे वडील…”

अनुपम खेर यांना गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. फोटोमध्ये अनुपम यांनी उजव्या हाताला सिलिंग लावलेले दिसत आहे. अनुपम खेर यांच्या हातात व्यायामाचा चेंडूही दिसत आहे. अनुपम खेर यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होत नाही! हे कसे होऊ शकते? काल ‘विजय ६९’च्या शूटिंगदरम्यान खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे.”

अनुपम यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “दुखत आहे, पण जेव्हा सिलिंग लावणाऱ्या भावाने सांगितले की, त्याने शाहरुख खान आणि हृतिक रोशनच्या खांद्यालाही सिलिंग लावले होते, तेव्हा दुखणे थोडे कमी झाले.” अनुपम पुढे म्हणाले, “पण जेव्हा मी जोरात खोकतो, तेव्हा माझ्या तोंडातून कण्हण्याचा आवाज निघतो. पण फोटोत हसण्याचा प्रयत्न खरा आहे! काही दिवसांनी शूटिंग सुरू होईल.”

अनुपम खेर यांच्या फोटोवर नीना गुप्तांची कमेंट

अनुपम खेर यांच्या या फोटोवर नीना गुप्ता यांनी कमेंट केली आहे. नीना गुप्ता यांनी कमेंट मध्ये लिहिलं आहे, “अरे, तुम्ही काय केलं?” नीना गुप्ता यांना उत्तर देत अनुपम खेर यांनी लिहिले, “तुझ्या आणि माझ्यासारख्या महान अभिनेत्यांचे असेच होते! किरकोळ दुखापती.”