Anupam Kher Pays Tribute To Dr Manmohan Singh : अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून, त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण काढताना “पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल” असे म्हटले आहे. अनुपम खेर यांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका केली होती.

अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यांनी सांगितले, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. मी सध्या देशाबाहेर आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला समजून घेण्यासाठी मी दीड वर्ष त्यांचा अभ्यास केला, त्यांचा स्वभाव, वर्तन, आणि वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला.”

Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas: “प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…”, परळी पॅटर्नचा उल्लेख करत सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
manmohan singh passed away (1)
Dr. Manmohan Singh Death: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!
pm narendra modi on dr manmohan singh death
Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”
Mika Singh angry because Anant Ambani did not gift him 2 crore
अनंत अंबानीने २ कोटींचे घड्याळ न दिल्याने प्रसिद्ध गायक नाराज; लग्नात किती मानधन मिळालं? म्हणाला, “५ वर्षे आरामात…”
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

हेही वाचा…‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित

अनुपम खेर यांनी पुढे सांगितले, “एखाद्या व्यक्तिरेखेला साकारण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतर्मनात जावे लागते. डॉ. मनमोहन सिंग हे मुळातच चांगले, सौम्य, हुशार, आणि दयाळू होते. जर तुम्ही ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ चित्रपट आता पाहिलात, तर तुम्हाला दिसेल की, मी त्यांच्या काही गुणांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला काही कारणांमुळे मी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.” ते पुढे म्हणाले, “या सिनेमातील भूमिका मला माझ्या करिअरमधील सर्वांत आवडत्या आणि प्रामाणिकपणे साकारलेल्या भूमिकांपैकी एक वाटते.”

पाहा व्हिडीओ –

अनुपम खेर यांनी पुढे या व्हिडीओमध्ये सांगितले, “मी डॉ. मनमोहन सिंग यांना १-२ कार्यक्रमांमध्ये भेटलो होतो. ते माझ्याशी खूप चांगले वागले. त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकांना ऐकून घेण्याची तयारी ही खूप सुंदर गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे. त्यांचा दयाळूपणा हा आजच्या काळात दुर्मिळ आहे.”

हेही वाचा…“कायम तुमचे ऋणी राहू” मनमोहन सिंग यांना सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली; रितेश देशमुख वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

देशाने महान नेता गमावला

अनुपम शेवटी व्हिडीओत म्हटले, “जेव्हा चित्रपट तयार झाला , तेव्हा मला आनंद झाला की, मी त्यांच्या व्यक्तिरेखेला न्याय देऊ शकलो. विषय वादग्रस्त असू शकतो, पण तो माणूस वादग्रस्त नव्हता. पगडीतील त्या व्यक्तीची खूप आठवण येईल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखाचा सामना करण्याचे बळ मिळो. देशाने एक प्रामाणिक माणूस आणि महान नेता गमावला आहे.”

हेही वाचा…“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. पंजाबमध्ये १९३२ साली जन्मलेले मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत दोनदा भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले.

Story img Loader